esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 12 सप्टेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
शनिवार - भाद्रपद कृ.10, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.24, सूर्यास्त 6.39, चंद्रोदय रा. 12.57, चंद्रास्त दु. 2.44, भारतीय सौर 21, शके 1942.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 12 सप्टेंबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
शनिवार - भाद्रपद कृ.10, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.24, सूर्यास्त 6.39, चंद्रोदय रा. 12.57, चंद्रास्त दु. 2.44, भारतीय सौर 21, शके 1942.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९२६ - मराठी साहित्यसंशोधक, ग्रंथकार आणि ‘महाराष्ट्र सारस्वत’ या मराठी साहित्येतिहास ग्रंथाचे लेखक विनायक लक्ष्मण भावे यांचे निधन. १८९३ मध्ये त्यांनी ठाणे येथे मराठी ग्रंथसंग्रहालयाची स्थापना केली.
१९४८ - भारताच्या फौजा हैदराबाद संस्थानाच्या हद्दीत शिरल्या. जुलमी रझाकारांच्या मदतीने स्वतंत्र राहण्याचा निजामाचा हट्ट मोडून या फौजांनी हैदराबाद मुक्त केले. हैदराबाद मुक्तीच्या या कारवाईचे ‘पोलिस ॲक्‍शन’ असे वर्णन केले जाते.
१९५२ - सवाई गंधर्व ऊर्फ रामचंद्र गणेश कुन्दगोळकर यांचे निधन. पै. खाँसाहेब अब्दुल करीम खाँ यांचे ते शिष्य होते. ते उत्तम गायक असल्याने कै. दादासाहेब खापर्डे यांनी उमरावतीस जाहीरपणे ‘सवाई गंधर्व’ अशी पदवी दिली होती. 
१९८० - मराठी रंगभूमी तसेच चित्रपटसृष्टीतील अभिनेते सतीश दुभाषी यांचे निधन. ‘अंमलदार’, ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘हिरा जो भंगला नाही’, ‘नटसम्राट’, ‘ती फुलराणी’, ‘सूर राहू दे’ या नाटकांतील तसेच ‘सिंहासन’, ‘चांदोबा,चांदोबा भागलास का’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका वैशिष्ट्यपूर्ण होत्या.
१९९२ - हिंदुस्थानी संगीत क्षेत्रातील एक श्रेष्ठ गायक पंडित मल्लिकार्जुन मन्सूर यांचे निधन. ग्वाल्हेर घराण्याचे एक दिग्गज पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य नीलकंठबुवा अलूरमठ आणि जयपूर घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अल्लादिया खाँ यांचे दोघे पुत्र मंजी खाँ व भुर्जी खाँ असे तीन गुरू त्यांना लाभले. सावनी नट, बसंती केदार, यमनी बिलावल, खट तोडी, जैत कल्याण आदी जोडरागांचे अखंड स्वरूप त्यांच्या गायनातून दिसत असे. त्यांना ‘पद्मविभूषण सन्मान’, ‘कालिदास सन्मान’ आदी मानसन्मान लाभले.
१९९५ - महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांचे निकटचे सहकारी व ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक सुकाभाऊ चौधरी यांचे परमधाम पवनार आश्रमामध्ये निधन.
१९९५ - प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक आणि कन्नड संघाचे पुण्यातील संस्थापक डॉ. श्‍यामराव कलमाडी यांचे निधन. 

दिनमान -
मेष  :
गुरुकृपा लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. मन आनंदी राहील.
वृषभ : काहींना एखादी गुप्त वार्ता समजेल. अचानक धनलाभाची शक्यता आहे. 
मिथुन : आत्मविश्‍वास वाढेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडेल. 
कर्क  : प्रवास शक्यतो टाळावेत. एखादी चिंता लागून राहील. काहींना नैराश्य जाणवेल.
सिंह : हाती घेतलेल्या कामात यश लाभेल. मित्रमैत्रिणींचा सल्ला लाभदायक ठरेल.
कन्या : मानसन्मान व अधिकार लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती होईल.
तूळ : काहींना गुरुकृपा लाभेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. प्रसिद्धी व सुसंधी लाभेल.
वृश्‍चिक : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता राहील. 
धनू : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
मकर  : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हाताखालील कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभेल. 
कुंभ : शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे. हाती घेतलेले काम पूर्ण कराल.
मीन : दिवस अनुकूल आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात यश लाभेल.

Edited By - Prashant Patil