
पंचांग -
रविवार : कार्तिक कृष्ण १४, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्चिक, सूर्योदय ६.५९ सूर्यास्त ५.५८, चंद्रोदय सकाळी ६.२२, चंद्रास्त दुपारी ४.५१, शिवरात्री, (अमावास्या प्रारंभ रात्री १२. ४४ वा., )भारतीय सौर मार्गशीर्ष २२ शके १९४२.
पंचांग -
रविवार : कार्तिक कृष्ण १४, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्चिक, सूर्योदय ६.५९ सूर्यास्त ५.५८, चंद्रोदय सकाळी ६.२२, चंद्रास्त दुपारी ४.५१, शिवरात्री, (अमावास्या प्रारंभ रात्री १२. ४४ वा., )भारतीय सौर मार्गशीर्ष २२ शके १९४२.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दिनविशेष -
१९३० : डॉ. शरदकुमार दीक्षित यांचा जन्म. प्लॅस्टिक सर्जरी या विषयात ते जगप्रसिद्ध आहेत. आजवर ६६,००० रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया त्यांनी केल्या आहेत.
१९४० : कोल्हापूरचे लेखक व संशोधक गणेश रंगो भिडे यांच्या व्यावहारिक ज्ञानकोशाचा पाचवा व शेवटचा भाग प्रसिद्ध झाला. एकट्याच्या प्रयत्नाने पूर्ण झालेले हे काम विशेष मानले जाते.
१९९४ : सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, वारणा परिसराच्या विकासाचे शिल्पकार व आशिया खंडातील आदर्श मानल्या जाणाऱ्या वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक विश्वनाथ अण्णा ऊर्फ तात्यासाहेब कोरे यांचे निधन.
१९९६ : देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील कॅपिटॉल बाँबस्फोट प्रकरणाचे सूत्रधार व ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारक श्रीधर पुरुषोत्तम ऊर्फ शिरुभाऊ लिमये यांचे निधन.
१९९६ : कलकत्ता येथे झालेल्या राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेत पुण्याच्या चंद्रशेखर गोखलेने बांगलादेशच्या झिया उर रेहमानला बरोबरीत रोखून इंटरनॅशनल किताबाचा पहिला नॉर्म पूर्ण केला.
१९९६ : पुण्याच्या आशिष आठवलेने धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया हे ३७ किलोमीटरचे अंतर सात तास २२ मिनिटांत पूर्ण केले.
२००२ : ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना २००१चा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर. भारतीय चित्रपट जगतातील हा सर्वोच्च सन्मान आहे.
दिनमान -
मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
वृषभ : जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. भागीदारी व्यवसायात यश लाभेल.
मिथुन : विरोधकांवर मात कराल. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.
कर्क : गुंतवणुकीची कामे मार्गीै लागतील. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल.
सिंह : तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. आरोग्य चांगले राहील.
कन्या : जिद्द व चिकाटी वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रियजनांचा सहवास लाभेल.
तुळ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. काहींना गुप्त वार्ता समजेल.
वृश्चिक : आरोग्य उत्तम राहील. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.
धनु : आरोग्याच्या तक्रारी वाढतील. कामाचा ताण व दगदग जाणवेल.
मकर : कला क्षेत्रासाठी दिवस चांगला. सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
कुंभ : सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल.
मीन : काहींना गुरूकृपा लाभेल. प्रवास सुखकर होतील.
Edited By - Prashant Patil