esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 13 सप्टेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
रविवार - भाद्रपद कृ.11, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.24, सूर्यास्त 6.39, चंद्रोदय रा. 1.53, चंद्रास्त दु. 3.38, भारतीय सौर 22, शके 1942.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 13 सप्टेंबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
रविवार - भाद्रपद कृ.11, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.24, सूर्यास्त 6.39, चंद्रोदय रा. 1.53, चंद्रास्त दु. 3.38, भारतीय सौर 22, शके 1942.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८५१ - अमेरिकन लष्करी डॉक्‍टर व सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ वॉल्टर रीड यांचा जन्म.  पीतज्वरावर (पिवळा ताप) त्यांनी संशोधन केले. त्यांच्या संशोधनामुळे अमेरिका, मेक्‍सिको, वेस्ट इंडीज, पनामा कालवा या भागांतील पीतज्वराचे उच्चाटन करता आले. 
१९२८ - प्रसिद्ध हिंदी कवी श्रीधर पाठक यांचे निधन. लखनौ येथे भरलेल्या पाचव्या हिंदी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. निसर्गसौंदर्य, देशभक्ती व समाजसुधारणा हे विषय त्यांच्या काव्यात प्रामुख्याने आले आहेत. हिंदी खडी बोलीचा काव्यात वापर करण्यावर त्यांनी भर दिला. ‘जगत सचाई सार’ ही त्यांची काव्यरचना प्रसिद्ध आहे.
१९२९ - लाहोर कटातील आरोपी जतींद्रनाथ दास यांनी तुरुंगातील जुलमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात त्यांचा त्रेसष्टाव्या दिवशी मृत्यू.
१९७१ - मराठी रंगभूमीवरील अभिनेते, नाट्यशिक्षक केशवराव त्र्यंबक दाते यांचे निधन. ‘आग्य्राहून सुटका’ मधील औरंगजेब, ‘आंधळ्यांची शाळा’मधील मनोहर या त्यांच्या भूमिका गाजल्या. अमृतमंथन, कुंकू, शेजारी, सावकारी पाश या चित्रपटांत त्यांनी प्रभावी भूमिका केल्या.
१९९५ - आसाममधील ज्येष्ठ साहित्यिक आणि इतिहासकार डॉ. महेश्‍वर नियोग यांचे निधन.
१९९६ - उदयोन्मुख बॅडमिंटनपटू व कुमार गटातील राष्ट्रीय विजेता सुशांत अजित चिपलकट्टी यांचे अपघाती निधन.
१९९९ - जम्मू-काश्‍मीरमधील राजौरी भागात अतिरेक्‍यांशी लढताना पुण्यातील कॅप्टन नितीन प्रकाश चव्हाण धारातीर्थी पडले. 
१९९९ - आंद्रे अगासीने टॉड मार्टिनचे पाच सेटमधील कडवे आव्हान मोडून काढीत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. अमेरिकन स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकणाऱ्या अगासीचे कारकिर्दीतील हे पाचवे ग्रॅंडस्लॅम विजेतेपद आहे.
२००३ - ज्येष्ठ गायक पं. दिनकर कैकिणी यांना २००३ चा तानसेन पुरस्कार तर मेंडोलिन वादक यू. श्रीनिवास यांना राष्ट्रीय कुमारगंधर्व पुरस्कार जाहीर.
२००४ - रॉजर फेडररने लेटन ह्युईटला सरळ सेटमध्ये पराभूत करून अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले.

दिनमान -
मेष  :
खरेदीःविक्रीसाठी दिवस चांगला आहे. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. 
वृषभ : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल. 
मिथुन : व्यवसायातील निर्णय अचूक ठरतील. सुसंवाद साधाल. उधारी, उसनवारी वसूल होईल.
कर्क  : आरोग्य उत्तम राहील. उत्साह वाढेल. व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील.
सिंह : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
कन्या : मुलामुलींच्या संदर्भात एखादी भाग्यकारक घटना घडेल. अनेक लाभ होतील. 
तूळ : सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल. व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लागतील. 
वृश्‍चिक : प्रसिद्धी लाभेल. गुरुकृपा लाभेल. मानसिक अस्वस्थता कमी होईल.
धनू : आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये.वादविवाद टाळावेत. प्रवासात काळजी घ्यावी.
मकर  : वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. भागीदारीत नफा होण्याची शक्यता आहे. 
कुंभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
मीन : संततीच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. उत्साह व उमेद वाढेल.

Edited By - Prashant Patil