esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 14 ऑगस्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
शुक्रवार - श्रावण कृ. 10, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 6.17, सूर्यास्त 7.03, चंद्रोदय रा.1.28, चंद्रास्त दु.3.05, भारतीय सौर 22, शके 1942.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 14 ऑगस्ट

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
शुक्रवार - श्रावण कृ. 10, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 6.17, सूर्यास्त 7.03, चंद्रोदय रा.1.28, चंद्रास्त दु.3.05, भारतीय सौर 22, शके 1942.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८६७ - नोबेल पारितोषिक विजेते लेखक आणि नाटककार जॉन गॉल्सवर्दी यांचा जन्म.
१९८४ - हेलसिंकीच्या ऑलिंपिक स्पर्धेत १९५२ मध्ये भारताला ब्राँझपदक मिळवून देणारे कुस्तीगीर खाशाबा दादासाहेब जाधव यांचे निधन. 
१९२५ - कादंबरीकार, नाटककार आणि विनोदी लेखक जयवंत दळवी यांचा जन्म. 
१९४७ - भारताच्या घटना समितीने सत्ता स्वीकारण्याचा ठराव मंजूर केला आणि लॉर्ड माऊंटबॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक केली.
१९५५ - पेरांबूर येथे रेल्वेच्या डब्याची निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा प्रारंभ.
१९९४ - हबल अंतरिक्ष दुर्बिणीद्वारे युरेनस ग्रहाच्या कड्यांची छायाचित्रे घेण्यात यश.
१९९९ - कारगिल संघर्षात अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्या कॅप्टन विक्रम बात्रा यांना ‘परमवीर चक्र’ हे अत्युच्च शौर्यपदक जाहीर.
२००० - काश्‍मीर खोऱ्यात वीरमरण आलेले कॅ. गुरजिंदरसिंग सुरी यांना  ‘महावीर चक्र’ (मरणोत्तर) जाहीर.
२००४ -  देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार  ‘श्‍वास’ या मराठी चित्रपटाने पटकाविला. आचार्य अत्रे यांच्या ‘श्‍यामची आई’नंतर ५१ वर्षांनी मराठी चित्रपटाला पुन्हा हा मान मिळाला आहे. 

दिनमान -
मेष :
मानसिक प्रसन्नता लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. वादविवाद टाळावेत.
वृषभ : कला क्षेत्रातील व्यक्‍तींना दिवस चांगला आहे. शैक्षणिक क्षेत्रात अडथळे येतील.
मिथुन : नातेवाइकांसाठी खर्च कराल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. विरोधकांवर मात कराल.
कर्क  : सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. उधारी वसूल होईल.
सिंह : आरोग्य उत्तम राहील. राजकीय क्षेत्रात प्रगती होईल. विरोधकांवर मात कराल.
कन्या : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
तूळ : राजकीय क्षेत्रात दिवस चांगला जाईल. शासकीय कामे मार्गी लागतील.
वृश्‍चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. 
धनू : वाहने चालवताना काळजी घ्यावी. नवीन संधी चालून येतील. 
मकर : व्यापार, व्यवसायात प्रगती होईल. नोकरचाकर, कर्मचारी यांचे सहकार्य लाभेल.  
कुंभ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. नोकरीमध्ये बढतीची शक्‍यता आहे.
मीन : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. वादविवाद टाळावेत.

Edited By - Prashant Patil