esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १४ जून
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
रविवार : ज्येष्ठ कृ. ९, चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.१३, चंद्रोदय रा. ०१.१५, चंद्रास्त दु. १.३०,  भारतीय सौर २४, शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १४ जून

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
रविवार : ज्येष्ठ कृ. ९, चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.१३, चंद्रोदय रा. ०१.१५, चंद्रास्त दु. १.३०,  भारतीय सौर २४, शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८९६ - महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी ‘अनाथ बालिकाश्रम’ ही संस्था स्थापन केली. यातून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, महिला महाविद्यालये, महिला विद्यापीठ असे मोठमोठे उपक्रम निर्माण झाले.
१९१६ - प्रसिद्ध नाटककार आणि नाट्यदिग्दर्शक गोविंद बल्लाळ देवल यांचे निधन. त्यांच्या शारदा, मृच्छकटिक, झुंजारराव आणि संशयकल्लोळ या नाटकांना प्रायोगिक यश लाभले. 
१९६१ - भौतिकशास्त्रज्ञ सर कार्यमणिक्कम श्रीनिवास कृष्णन यांचे निधन. मद्रास येथील ख्रिश्‍चन कॉलेजात काही काळ अध्यापन केल्यावर प्रख्यात शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांचे सहायक म्हणून कृष्णन यांची नेमणूक झाली. 
१९६९ - जर्मनीची टेनिस सम्राज्ञी स्टेफी ग्राफ हिचा जन्म.
१९८९ - मराठी रंगभूमीवरील  ज्येष्ठ अभिनेत्री व संस्कृतपंडित सुहासिनी मूळगावकर यांचे निधन. मराठी रंगभूमीवरील एकपात्री नाट्यप्रयोगाची सुरवात त्यांनी केली. ३१ जानेवारी १९६० रोजी ‘सौभद्र’चा एकपात्री प्रयोग त्यांनी सादर केला. एकपात्री सौभद्रचे ५०० प्रयोग करून त्यांनी एक नवाच विक्रम केला होता.
१९९५ - नोटांची अधूनमधून होणारी टंचाई लक्षात घेऊन, कर्नाटकात म्हैसूर येथे आणि पश्‍चिम बंगालमध्ये खरगपूरजवळ सालबोनी येथे नोटा छापण्याचे दोन छापखाने उभारण्याचा रिझर्व्ह बॅंकेचा निर्णय.
१९९५ - चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक सुरेश भट यांचे निधन.
१९९७ - भारताचा वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद ‘सीएट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरस्कारा’चा मानकरी.
२००१ - दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला यांना कॅनडाचे सन्मान्य नागरिकत्व बहाल करण्याची शिफारस करणारा ठराव तेथील संसदेने एकमताने मंजूर केला. तो मिळविणारे ते पहिलेच हयात परदेशी नागरिक होत.
२००१ - एसी (अल्टरनेट करंट) आणि डीसी या दोन्ही विद्युत प्रवाहांवर धावणाऱ्या पहिल्या उपनगरी गाडीचा (इलेक्‍ट्रिक मल्टिपल युनिट-ईएमयू) शुभारंभ पश्‍चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक वासुदेव गुप्ता यांच्या हस्ते ‘हिरवा झेंडा’ दाखवून झाला. संपूर्णपणे निळ्या रंगाने रंगविलेली आणि त्यावर पिवळे पट्टे ओढलेली ही ‘ईएमयू’ गाडी १५०० व्होल्ट डीसी आणि २५ केव्ही एसी या दोन्ही विद्युत प्रवाहांवर धावते.
२००३ - हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ चरित्र कलाकार जानकीदास मेहरा यांचे निधन. जवळजवळ एक हजारांहून अधिक चित्रपटांत काम करणाऱ्या जानकीदास मेहरा यांनी प्रॉडक्‍शन डिझायनर म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. ‘पत्थर और पायल’, ‘वॉरंट’ या चित्रपटांसाठी त्यांनी प्रॉडक्‍शन डिझायनर म्हणून काम केले.

दिनमान -
मेष : अनावश्‍यक कामात वेळ वाया जाईल.  तुमचे प्रयत्न कमी पडणार आहेत.
वृषभ : जबाबदारी वाढणार आहे. कामाचा ताण वाढेल. कला क्षेत्रात लाभ होतील. 
मिथुन : सार्वजनिक क्षेत्रात प्रभाव राहील. चिकाटी वाढेल. मनोबल उत्तमअसणार आहे.
कर्क : अस्वस्थता कमी होणार. आरोग्य सुधारेल. मानसिक ताणतणाव कमी होतील. 
सिंह : दैनंदिन कामात अडचणी जाणवण्याची शक्‍यता आहे.  मनोबल कमी राहील.
कन्या : आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.  
तुळ : हितशत्रुंवर मात कराल. अनावश्‍यक खर्चांचा सामना करावा लागेल. 
वृश्‍चिक : कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. आरोग्याचा त्रास कमी होईल. 
धनु  : सौख्यकारक घटना घडतील. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. 
मकर : आत्मविश्वासपूर्वक पावले टाकाल.  कार्य साफल्याचा आनंद मिळेल. 
कुंभ : मनोबल उत्तमराहील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद असणार आहे. 
मीन : तुमचा उत्साह व उमेद वाढविणारी घटना घडेल. चिकाटी वाढेल.