esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 14 सप्टेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
सोमवार - भाद्रपद कृ.12, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय 6.24, सूर्यास्त 6.38, चंद्रोदय रा. 2.52, चंद्रास्त दु. 4.31, भारतीय सौर 23, शके 1942.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 14 सप्टेंबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
सोमवार - भाद्रपद कृ.12, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय 6.24, सूर्यास्त 6.38, चंद्रोदय रा. 2.52, चंद्रास्त दु. 4.31, भारतीय सौर 23, शके 1942.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
हिंदी दिन 

१९४८ - दोन तासांच्या चकमकीनंतर भारतीय सैन्याने दौलताबादचा किल्ला जिंकून घेतला. देवगिरीच्या यादवांचे साम्राज्य नष्ट झाल्यानंतर साडेसहाशे वर्षांनी स्वतंत्र झालेल्या किल्ल्यात भारतमातेचे मंदिर उभारण्यात आले.
१९४९ - देवनागरी लिपीतील हिंदी भाषेला राष्ट्रभाषा म्हणून घटना समितीची मान्यता.
१९७८ - व्हेनेट-१२ हे मानवविरहित अंतराळयान तत्कालीन सोव्हिएत युनियनद्वारे शुक्राकडे रवाना.
१९८९ - नामवंत कृषिशास्त्रज्ञ व भारतीय कृषी परिषदेचे निवृत्त महासंचालक डॉ.बेंजामिन पाल यांचे निधन.
१९९५ - संगीतकार दत्ता डावजेकर यांना महाराष्ट्र सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.
१९९८ - ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. राम जोशी यांचे निधन.
२००१ - जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या ‘आकाश’ या क्षेपणास्त्राची चंडीपूर येथील तळावरून यशस्वी चाचणी.

दिनमान -
मेष  :
रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. प्रवास सुखकर होतील. आरोग्य उत्तम राहील.
वृषभ : नातेवाइकांच्या गाठीभेटी होतील. साहित्याच्या क्षेत्रातील व्यक्तींना सुसंधी लाभेल. 
मिथुन : अपेक्षित पत्र व्यवहार व गाठीभेटी होतील. व्यवसायात गुंतवणुकीस दिवस चांगला आहे. 
कर्क  : कौटुंबिक सुसंवाद साधाल. कला क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे. 
सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. 
कन्या : थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. भाग्यकारक घटना घडतील. पत्र व्यवहार होतील.
तूळ : शासकीय कामे मार्गी लागतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. 
वृश्‍चिक : नव्या उमेदीने कार्यरत रहाल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.
धनू : महत्त्वाचे निर्णय टाळावेत. वाहने चालवताना काळजी घ्यावी.. 
मकर  : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आत्मविश्‍वास वाढविणारी घटना घडेल.
कुंभ : प्रवासात वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे. मनोरंजनाकडे कल वाढेल. 
मीन : आरोग्य उत्तम राहील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. अपेक्षित गाठीभेटी होतील.

Edited By - Prashant Patil