आजचे राशिभविष्य आणि पंचांग- १५ जानेवारी २०२१

Daily Horoscope
Daily Horoscope

शुक्रवार : पौष शुद्ध २, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर/कुंभ, चंद्रोदय सकाळी ८.५६, चंद्रास्त रात्री ८.२९, करिदिन, मु. जमादिलाखर मासारंभ, भारतीय सौर पौष २४ शके १९४२.

----------------------------------------------

दिनविशेष
१९१९ : राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी आदेश काढून स्पृश्‍य-अस्पृश्‍य विद्यार्थ्यांना एकाच शाळेत शिक्षण देण्याची व्यवस्था केली.
१९२९ : कृष्णवर्णीय अमेरिकनांचे गांधी म्हणून ओळखले जाणारे मार्टिन ल्यूथर किंग  यांचा जन्म. गांधींप्रमाणेच यांनाही माथेफिरूच्या गोळ्यांचे बळी व्हावे लागले.
१९७१ : महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार दीनानाथ दलाल यांचे मुंबईत निधन.
१९९६ : भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा व संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर (व्हिक्‍टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ असे करण्यात आले. 
१९९८ : माजी हंगामी पंतप्रधान, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते गुलझारीलाल नंदा यांचे निधन.
१९९९ : ज्येष्ठ गायिका ज्योत्स्ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ प्रदान.

----------------------------------------------


दिनमान
मेष : नोकरीत बढतीची शक्‍यता आहे. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
वृषभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचा जनसंपर्क वाढेल.
मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्र्रसिद्धी लाभेल. प्रवास सुखकर होतील.
सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींना अचानक धनलाभ संभवतो.
कन्या : बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्‍तींना आजचा दिवस चांगला आहे. 
तुळ : नोकरी व व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. 
वृश्‍चिक : कामात सुयश लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
धनु : कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
मकर : एखादी भाग्यकारक घटना घडेल. उत्साह व उमेद वाढेल.
कुंभ : वाहने चालवताना काळजी घ्यावी. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
मीन : मुलामुलींच्या प्रगतीसाठी जादा खर्च करावा लागेल. 
प्रा. रमणलाल शहा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com