आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १५ जुलै

Bhavishya
Bhavishya

पंचांग -
बुधवार - आषाढ कृ. १०, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.०८, सूर्यास्त ७.१५, चंद्रोदय रा. १.३०, चंद्रास्त दु. २.३६, भारतीय सौर २४, शके १९४२.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९६२ - शिक्षणक्षेत्रातील महत्त्वपूर्ण व यशस्वी प्रयोग मानल्या जाणाऱ्या ‘ज्ञानप्रबोधिनी’ या संस्थेचा पुणे येथे प्रारंभ.
१९९८ - ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते व स्वातंत्र्यसैनिक ताराचंद परमार यांचे निधन.
१९९९ - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या इंदूताई टिळक यांचे निधन.
१९९९ - प्रसिद्ध पर्यावरणवादी लेखक, सामाजिक कार्यकर्ते जगदीश गोडबोले यांचे निधन.
२००० - निवडणूक आयोगाचे ओळखपत्र किंवा शिधापत्रिका मिळविल्याने कोणतीही परदेशी व्यक्ती भारतीय नागरिक बनू शकत नाही, असा दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल.
२००४ - ज्येष्ठ स्त्री रोगतज्ज्ञ, समाजसेविका, तसेच केईएम रुग्णालय आणि ‘सकाळ’च्या संचालिका डॉ. बानू कोयाजी यांचे निधन. प्रसूतिशास्त्र, बालआरोग्य, ग्रामीण व नागरी आरोग्य आणि कुटुंबनियोजन या क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेल्या कार्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली होती. भारत सरकारचा ‘पद्मभूषण’, तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या रॅमन मॅगेसेसे पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते.
२००४ - टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दिला जाणारा टिळक सन्मान पुरस्कार इन्फोसिस कंपनीचे अध्यक्ष एन.आर.नारायणमूर्ती यांना जाहीर.

दिनमान -
मेष :
आरोग्याकडे लक्ष द्यावयास हवे. नवीन जनसंपर्क वाढेल.
वृषभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. वैवाहिक सौख्य लाभेल.
मिथुन : अनेकांचे सहकार्य लाभेल. फार मोठे धाडस टाळावे.
कर्क : आत्मविश्‍वास वाढेल. प्रगतीच्या दृष्टीने काही चांगल्या गोष्टी घडतील.
सिंह : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.
कन्या : भागीदारी व्यवसायात मतभेद वाढतील. वाहने काळजीपूर्वक चालवावीत.
तुळ : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
वृश्‍चिक : शासकीय कामे पुढे ढकलावीत. सहकार्यावर अवलंबून राहू नका.
धनु : मित्रांचे सहकार्य लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल.
मकर : विरोधकावर मात कराल. कलेच्या क्षेत्रात यश लाभेल.
कुंभ : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. व्यवसायाची उलाढाल वाढेल.
मीन : आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही. व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com