esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 15 ऑक्टोबर
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 15 ऑक्टोबर

पंचांग -
गुरुवार - अधिक आश्विन कृष्ण १३/१४, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ६.२९, सूर्यास्त ६.१०, चंद्रोदय पहाटे ५.४५, चंद्रास्त सायंकाळी ५.२२, शिवरात्री, पारशी खोरदाद मासारंभ, अमावास्या प्रारंभ पहाटे ४.५२, भारतीय सौर २३ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 15 ऑक्टोबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
गुरुवार - अधिक आश्विन कृष्ण १३/१४, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ६.२९, सूर्यास्त ६.१०, चंद्रोदय पहाटे ५.४५, चंद्रास्त सायंकाळी ५.२२, शिवरात्री, पारशी खोरदाद मासारंभ, अमावास्या प्रारंभ पहाटे ४.५२, भारतीय सौर २३ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
जागतिक अंध दिन । जागतिक पांढरी काठी दिन
१५४२ - मोगल सम्राट अकबर बादशहाचा जन्म. त्यांची शासनव्यवस्था न्याय, सहिष्णुता व गुणवत्ता या तीन तत्त्वांवर आधारलेली होती.
१९३१ - भारताचे राष्ट्रपती व भारतातील एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे जनक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म. त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न या सन्मानांनी गौरविण्यात आले. 
१९३२ - जे. आर. डी. टाटा यांनी कराची ते मुंबई असा प्रवास करून नागरी विमानसेवेची सुरवात केली.

दिनमान -
मेष :
आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. गुरूकृपा लाभेल.
वृषभ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. नवीन परिचय होतील. मानसन्मानाचे योग येतील.
मिथुन : कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रवास सुखकर होतील. आध्यात्मिकतेकडे कल राहील.
कर्क : नातेवाईकांचे सौख्य लाभेल. आपली मते इतरांना पटवून द्याल.
सिंह :  व्यवसायात उत्तम स्थिती राहील. अचानक धनलाभाची शक्यता आहे.
कन्या : आत्मविश्‍वास व मनोबल वाढेल. प्रवास सुखकर होतील. कामे मार्गी लागतील.
तुळ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.गाठीभेटी होतील. 
वृश्‍चिक : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. अकारण वेळ वाया जाण्याची शक्यता आहे. 
धनु : शासकीय कामात यश लाभेल. सामाजिक क्षेत्रात प्रगती होईल.सुसंवाद साधाल. 
मकर : मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.
कुंभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.
मीन : वैवाहिक सौख्य लाभेल. भागीदारी व्यवसायातून लाभ होईल. सुयश लाभेल.

Edited By - Prashant Patil