esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १६ जून
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग - मंगळवार : ज्येष्ठ कृ. ११, चंद्रनक्षत्र  अश्र्विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.००, सूर्यास्त ७.१३, चंद्रोदय रा. ०२.२२, चंद्रास्त दु.३.०५, भारतीय सौर २६, शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १६ जून

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
मंगळवार : ज्येष्ठ कृ. ११, चंद्रनक्षत्र  अश्र्विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.००, सूर्यास्त ७.१३, चंद्रोदय रा. ०२.२२, चंद्रास्त दु.३.०५, भारतीय सौर २६, शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९४७ - नव्या कल्पक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने म. स. तथा बाबूराव पारखे यांनी मराठा चेंबरच्या वतीने कै. गो. स. पारखे औद्योगिक पारितोषिक देण्याला सुरवात केली.
१९५१ - तत्कालीन बडोदे संस्थानचे लष्करप्रमुख जनरल नानासाहेब शिंदे यांचे निधन. बडोद्याच्या लष्कराचे पहिले भारतीय प्रमुख होण्याचा मान त्यांना मिळाला. 
१९६३ - रशियाच्या व्हॅलेंटिना तेरेश्‍कोव्हा या महिलेने वोस्तोक-६ या यानातून अंतराळ प्रवास केला. ही जगातील अंतराळ प्रवास करणारी पहिली महिला होय.
१९९० - दिवसभरात मुंबई व उपनगरात शतकातील सर्वाधिक वृष्टी झाली. गेल्या १०४ वर्षांत जूनमध्ये एका दिवसात पडलेल्या पावसाचा (६००.४२ मिलिमीटर) नवा उच्चांक गाठला गेला. 
१९९५ - सकाळ पेपर्सचे माजी अध्यक्ष व विख्यात सॉलिसिटर आणि ज्येष्ठ कायदेपंडित जसवंतलाल मटुभाई यांचे निधन.
१९९५ - भारतीय चित्रपटसृष्टीत आपल्या पार्श्वगायनाने अजरामर झालेल्या लता व आशा या मंगेशकर भगिनींच्या मातोश्री शुद्धमती उर्फ माई मंगेशकर यांचे निधन.

दिनमान -
मेष : कामाचा ताण कमी राहील. तुमचा उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.  
वृषभ : आर्थिक कामे आज नकोत. काहींना दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत.
मिथुन : मनोबल उत्तम असणार आहे. चिकाटी वाढणार आहे. एखादी आनंददायी घटना घडेल. 
कर्क : सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येतील. आर्थिक कामे मार्गी लागतील. 
सिंह : अस्वस्थता कमी होईल. कामे मार्गी लागतील. दैनंदिन कामात स्वास्थ्य लाभेल.
कन्या : प्रवासामध्ये काळजी हवी. काहींना एखादी चिंता सतावेल. मनोबल कमी राहील. 
तुळ : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. 
वृश्‍चिक : दैनंदिन कामात अडचणी येत असल्यामुळे चिडचिड होणार आहे.
धनु : मनोबल उत्तम राहील. आनंददायी घटना घडेल. अनेकांबरोबर सुसंवाद साधाल. 
मकर : मनोबल उत्तम राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
कुंभ : नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील. आत्मविश्वासपूर्वक पावले टाकाल. 
मीन : स्वास्थ्य लाभणार आहे. कौटुंबिक जीवनात एखादी आनंददायी घटना घडेल.