
पंचांग -
बुधवार : माघ शुद्ध ६, चंद्रनक्षत्र आश्विनी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय सकाळी १०.३३, चंद्रास्त रात्री ११.२१, सूर्योदय ७.०२, सूर्यास्त ६.३४, भारतीय सौर माघ २७ शके १९४२.
पंचांग -
बुधवार : माघ शुद्ध ६, चंद्रनक्षत्र आश्विनी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय सकाळी १०.३३, चंद्रास्त रात्री ११.२१, सूर्योदय ७.०२, सूर्यास्त ६.३४, भारतीय सौर माघ २७ शके १९४२.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दिनविशेष -
१८५६ : अमेरिकन संशोधक फ्रेड्रिक युजिन आयव्हेक्स यांचा जन्म. छायाचित्रांच्या छपाईसाठी ठिपक्यांचा वापर करण्याचे हाफटोन तंत्र शोधून काढण्यात त्यांनी यश मिळविले. तोपर्यंत छपाई चित्रांचाच वापर होत असे. छायाचित्रे वापरता येत नसत.
१८८३ : क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे एडन येथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना निधन.
१९३२ : जेम्स चॅडविक या ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिकाने कॅव्हॅंडिश प्रयोगशाळेत अणूतील सूक्ष्म न्यूट्रॉन कणांचा शोध लावला.
१९७८ : प्रसिद्ध मराठी कवी, कादंबरीकार, समीक्षक, नाटककार व संपादक पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचे निधन.
२००० : भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक वाहनासाठी (जीएसएलव्ही) आवश्यक असलेल्या ‘क्रायोजेनिक संचातील’ चाचणी करण्यात भारत यशस्वी.
२००१ : मराठी चित्रपटरसिकांच्या हृदयसिंहासनावर अर्धशतकाहून अधिक काळ अधिराज्य गाजविणारे श्रेष्ठ अभिनेते आणि चित्रकार चंद्रकांत मांडरे यांचे निधन.
दिनमान -
मेष : रखडलेली कामे मार्गी लागतील. आत्मविश्वास वाढविणारी घटना घडेल.
वृषभ : प्रवास शक्यतो टाळावेत. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.
मिथुन : वैचारिक व बौद्धिक परिवर्तन होईल. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल.
कर्क : सार्वजनिक क्षेत्रात तुमचा दबदबा वाढेल. मान व प्रतिष्ठा लाभेल.
सिंह : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल.
कन्या : काहींना दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. प्रवास शक्यतो टाळावेत.
तुळ : आपली मते पटवून देण्यात यशस्वी व्हाल. वैवाहिक सौख्य लाभेल.
वृश्चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. प्रवासात काळजी घ्यावी.
धनु : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. संततिसौख्य लाभेल.
मकर : व्यवसायातील निर्णय मार्गी लावू शकाल. नोकरीत प्रगती होईल.
कुंभ : मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.
मीन : प्रवास सुखकर होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.
Edited By - Prashant Patil