esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १८ जून
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
गुरुवार : ज्येष्ठ कृ. १3, चंद्रनक्षत्र  भारणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.००, सूर्यास्त ७.१४, प्रदोष चंद्रोदय रा. ०३.३४, चंद्रास्त दु.४.४५ भारतीय सौर २८, शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १८ जून

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
गुरुवार : ज्येष्ठ कृ. १3, चंद्रनक्षत्र  भारणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.००, सूर्यास्त ७.१४, प्रदोष चंद्रोदय रा. ०३.३४, चंद्रास्त दु.४.४५ भारतीय सौर २८, शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८५८ - इंग्रजांचा पाठलाग टाळण्याच्या प्रयत्नात असताना झालेल्या चकमकीत झाशीच्या राणी लक्ष्मीबाई धारातीर्थी पडल्या. १८५७ मधील उठावाच्या त्या एक सूत्रधार होत्या.
१९०१ - ‘विविध ज्ञानविस्तार’ या मासिकाचे संपादक आणि ‘मोचनगड’ या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांचे निधन. त्यांना संस्कृत आणि इंग्रजी यांच्या जोडीला उर्दू, कन्नड, गुजराती व बंगाली याही भाषा येत होत्या.
१९५६ - महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी काढण्याच्या निर्णयाचा निषेध म्हणून डॉ. चिंतामणराव देशमुख यांनी केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
१९६२ - पुण्याच्या विधी महाविद्यालयाचे संस्थापक, माजी प्राचार्य आणि नामवंत विद्वान नानासाहेब घारपुरे यांचे निधन.
१९७४ - नामवंत संसदपटू व हिंदी साहित्यिक सेठ गोविंददास यांचे निधन. लोकसभेत हंगामी सभापती म्हणून १९५७ व १९६२ मध्ये त्यांची निवड झाली. हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून प्रतिष्ठित व्हावी, राष्ट्रलिपी म्हणून देवनागरी स्वीकारली जावी यासाठी त्यांनी अजोड कार्य केले.
१९९६ - वेस्ट इंडीजचा ब्रायन लारा सीएट आंतरराष्ट्रीय सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूच्या पुरस्काराचा मानकरी ठरला.
१९९९ - ज्येष्ठ साहित्यिक, कथा, कादंबरीकार श्रीपाद रामकृष्ण काळे यांचे निधन.

दिनमान -
मेष -
आर्थिक कामे दुपारनंतर होतील. मनोबल वाढेल. उत्साही राहणार आहात.
वृषभ - दुपारनंतर मानसिक अस्वस्थता कमी होईल. उत्साह वाढेल. प्रवास होतील. 
मिथुन - महत्त्वाची कामे दुपारपर्यंत करावीत. दुपारनंतर मनोबल कमी राहील.
कर्क - महत्त्वाच्या गाठीभेटी पडतील. आर्थिक लाभ होतील. मनोबल वाढेल.
सिंह - मनोबल व आत्मविश्‍वास उत्तमराहील. भाग्यकारक अनुभव येतील. 
कन्या - दुपारनंतर तुमचे मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. 
तूळ -  दुपारनंतर मानसिक अस्वस्थता राहील. वाहने चालविताना काळजी घ्यावी.
वृश्‍चिक - दुपारनंतर तुमचे मनोबल वाढेल. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागतील. 
धनू - दुपारनंतर अनावश्‍यक खर्च संभवतात. वाहने सावकाश चालवावीत. 
मकर -  नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे दुपारपूर्वी करावीत. 
कुंभ - जिद्दीने कार्यरत रहाल. आरोग्य उत्तम राहील. कामात सुयश लाभेल. 
मीन - आर्थिक कामे दुपारपूर्वी करावीत. आरोग्य उत्तम राहील. प्रवास होतील.