esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 17 नोव्हेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya_73.jpg

पंचांग-  मंगळवार : कार्तिक शुद्ध ३, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्चिक/धनू, सूर्योदय ६.४३, सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सकाळी ८.४६, चंद्रास्त रात्री ८.०६, मु. रबिलाखर मासारंभ, भारतीय सौर कार्तिक २६ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 17 नोव्हेंबर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग- 
मंगळवार : कार्तिक शुद्ध ३, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्चिक/धनू, सूर्योदय ६.४३, सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सकाळी ८.४६, चंद्रास्त रात्री ८.०६, मु. रबिलाखर मासारंभ, भारतीय सौर कार्तिक २६ शके १९४२.

आजचे दिनमान

मेष - महत्त्वाची कामे शक्‍यतो दुपारनंतर करावीत. आरोग्य चांगले राहील.
वृषभ - काहींना कौटुंबिक जीवनामध्ये एखादी चिंता लागून राहील. दुपारपूर्वी नातेवाईकांचे अपेक्षित सहकार्य लाभेल.
मिथुन - मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. रखडलेली कामे मार्गी लागतील.
कर्क - महत्त्वाच्या गाठीभेटी व पत्र व्यवहार दुपारपूर्वी उरकून घ्यावेत. काहींना मानसिक अस्वास्थ्य लाभेल.
सिंह - व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. संततिसौख्य लाभेल.
कन्या - जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
तुळ - काहींना गुरूकृपा लाभेल. आरोग्य चांगले राहील.
वृश्‍चिक - नातेवाईकांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. अचानक धनलाभाची शक्‍यता आहे.
धनु - खर्चाचे प्रमाण दुपारनंतर कमी होईल. आत्मविश्‍वास व मनोबल वाढेल.
मकर - वैवाहिक सौख्य लाभेल. आरोग्याच्या तक्रारी वाढतील.
कुंभ - मानसिक प्रसन्नता लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
मीन - तुमच्या कार्यक्षेत्रात ेनवनवीन संधी उपलब्ध होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात यश लाभेल.