esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 17 ऑक्टोबर
sakal

बोलून बातमी शोधा

dinman sakal main.jpg

शनिवारः निज आश्विन शुद्ध 1, चंद्र नक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 6.30, सूर्यास्त 6.09, चंद्रोदय सकाळी 7.04, चंद्रास्त सायंकाळी 6.52, घटस्थापना, शारदीय नवरात्रारंभ, मातामह श्राद्ध, निज आश्विन मासारंभ, भारतीय सौर आश्विन 25 शके 1942. 

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 17 ऑक्टोबर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचाग- 

शनिवारः निज आश्विन शुद्ध 1, चंद्र नक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 6.30, सूर्यास्त 6.09, चंद्रोदय सकाळी 7.04, चंद्रास्त सायंकाळी 6.52, घटस्थापना, शारदीय नवरात्रारंभ, मातामह श्राद्ध, निज आश्विन मासारंभ, भारतीय सौर आश्विन 25 शके 1942. 

दिनमान -

मेष - दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

वृषभ - खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

मिथुन - मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना आजचा दिवस चांगला जाईल.

कर्क - कौटुंबिक सौख्य लाभेल. विरोधकांवर मात कराल.

सिंह - कामानिमित्त छोेटे प्रवास होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या - व्यवसायात उत्तम स्थिती राहील. काहींना एखादी महत्त्वाची बातमी समजण्याची शक्यता आहे.

तुळ - आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

वृश्‍चिक - खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.

धनु - नवनवीन संधी मिळतील. थोरामोठ्यांची कृपा लाभेल.

मकर - सामाजिक क्षेत्रात प्रगती होईल. व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

कुंभ - आप्तजनांच्या गाठीभेटी होतील. तुमच्या क्षेत्रात प्रसिद्धी व सुसंधी लाभेल.

मीन - महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आज कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.