esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग- १८ जानेवारी २०२१
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Horoscope

सोमवार : पौष शुद्ध ५, चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय सकाळी १०.५४, चंद्रास्त रात्री ११.०५, सूर्योदय-७.११,  सूर्यास्त-६.१९, भारतीय सौर पौष २७ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग- १८ जानेवारी २०२१

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सोमवार : पौष शुद्ध ५, चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय सकाळी १०.५४, चंद्रास्त रात्री ११.०५, सूर्योदय-७.११,  सूर्यास्त-६.१९, भारतीय सौर पौष २७ शके १९४२.

---------------------------------

दिनविशेष
१८४२ : न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म.
१८८९ : नाट्यछटाकार दिवाकर (शंकर काशिनाथ गर्गे) यांचा पुणे येथे जन्म.
१९३६ : प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ व नेमस्त पुढारी रावबहाद्दूर काळे यांचे निधन. 
१९४७ : प्रसिद्ध गायक, अभिनेते कुंदनलाल सैगल यांचे निधन. 
१९६७ : प्रसिद्ध कृषितज्ज्ञ व क्रांतिकारक डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे नागपूर येथे निधन.
१९९९ : नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
२००३ : हिंदी साहित्याचे आधारस्तंभ, विख्यात कवी हरिवंशराय बच्चन यांचे निधन.

---------------------------------
दिनमान 
मेष : महत्त्वाची कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. प्रवास शक्‍यतो टाळावेत.
वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. अपेक्षित गाठीभेटी होतील.
मिथुन : सार्वजनिक कामात उत्साह वाढेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल.
कर्क : काहींना गुरुकृपा लाभेल. वैवाहिक सौख्य लाभेल.
सिंह : कामे रेंगाळण्याची शक्‍यता आहे. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
कन्या : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. शैक्षणिक क्षेत्रासाठी दिवस चांगला आहे.
तूळ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. अनपेक्षित खर्च करावा लागेल.
वृश्‍चिक : जिद्द व चिकाटी वाढेल. संततीचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. 
धनू : प्रॉपर्टीची कामे पार पडतील. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल.
मकर : जिद्द व चिकाटी वाढेल. प्रवास सुखकर होतील.
कुंभ : काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल.
मीन : आरोग्य चांगले राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
प्रा. रमणलाल शहा