आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १८ फेब्रुवारी २०२१

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 February 2021

पंचांग -
गुरुवार : माघ शुद्ध ६, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय सकाळी ११.०९, चंद्रास्त रात्री १२.१०, सूर्योदय ७.०१, सूर्यास्त ६.३५, मन्वादि, सौर वसंत ऋतू प्रारंभ, भारतीय सौर माघ २८ शके १९४२.

पंचांग -
गुरुवार : माघ शुद्ध ६, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय सकाळी ११.०९, चंद्रास्त रात्री १२.१०, सूर्योदय ७.०१, सूर्यास्त ६.३५, मन्वादि, सौर वसंत ऋतू प्रारंभ, भारतीय सौर माघ २८ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८११ : इंग्रजांनी माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन याची पुण्याचा रेसिडेंट म्हणून नेमणूक केली.
१८२३ : गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांचा जन्म. ‘प्रभाकर’ पत्रातून त्यांनी लिहिलेली ‘शतपत्रे’ मराठी वाङ्‌मयात आणि समाजसुधारणेत मोलाची आहेत.
१८७१ : हिंदू धर्मप्रसारक विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे निधन.
१९४४ : ‘भारतीय ज्ञानपीठ’ या संस्थेची स्थापना. या संस्थेतर्फे दिला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार भारतातील सर्वोच्च साहित्यिक सन्मान समजला जातो.
१९९४ : गेली चाळीस वर्षे आपल्या नृत्याने आणि चित्रपटातील नृत्यदिग्दर्शनाने रसिकांना आनंद देणारे ज्येष्ठ नर्तक गोपीकृष्ण यांचे निधन. 
१९९८ : ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. सुब्रह्मण्यम यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर. 
२००१ : प्रसिद्ध संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांना मध्य प्रदेश सरकारचा ‘लता मंगेशकर पुरस्कार’ प्रदान.  

दिनमान -
मेष :
आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
वृषभ : अनपेक्षितपणे एखादी मोठा खर्च संभवतो. हितशत्रुंवर मात कराल.
मिथुन : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. प्रियजनांचा सहवास लाभेल.
कर्क : व्यवसायातील निर्णय मार्गी लावू शकाल. महत्त्वाचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल.
सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधीलाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.
तुळ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. कामात सुयश लाभेल.
वृश्‍चिक : वाहने चालवताना दक्षता घ्यावी. हितशत्रुंवर मात कराल.
धनु : अपेक्षित सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील.
मकर : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल.
कुंभ : आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रवास करावा लागेल.
मीन : आर्थिक सुयश लाभेल. व्यवसायात वाढ करू शकाल.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily Horoscope and Panchang of 18th February 2021