esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १८ जुलै
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
शनिवार - आषाढ कृ. १३, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.०९, सूर्यास्त ७.१५, चंद्रोदय रा. ३.३७, चंद्रास्त सायं. ५.१९, भारतीय सौर २७, शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १८ जुलै

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
शनिवार - आषाढ कृ. १३, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.०९, सूर्यास्त ७.१५, चंद्रोदय रा. ३.३७, चंद्रास्त सायं. ५.१९, भारतीय सौर २७, शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९०९ - ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि प्रख्यात बंगाली कवी विष्णू डे यांचा जन्म. बंगालीखेरीज त्यांनी इंग्रजीतही आठ-दहा ग्रंथ लिहिले.
१९६९ - विख्यात कादंबरीकार शाहीर अण्णाभाऊ साठे यांचे निधन. त्यांच्या ‘फकिरा’ व ‘वारणेचा वाघ’ वगैरे कादंबऱ्या खूप गाजल्या.
१९८० - भारताने ‘एसएलव्ही-३’ या अवकाशयानाद्वारे  रोहिणी (आरएस-१) हा उपग्रह अंतराळात सोडला. या यशामुळे भारत हा उपग्रह सोडण्याची क्षमता असलेला जगातील सहावा देश ठरला.
१९८९ - ख्यातनाम संस्कृतज्ञ आणि पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे माजी संचालक डॉ. गोविंद केशव भट यांचे निधन.  संस्कृत, इंग्रजी आणि मराठी या तीन भाषांमधील त्यांनी लिहिलेले सुमारे पाऊणशे ग्रंथ प्रकाशित आहेत.
१९९४ - ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ आणि ‘इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च’चे अध्यक्ष मुनीस रझा यांचे अमेरिकेत निधन. दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरुपदही त्यांनी सांभाळले होते.
१९९४ - ‘शूमेकर लेव्ही-९’ या धूमकेतूचा सर्वांत मोठा ‘जी’ हा तुकडा विशाल गुरू ग्रहावर आदळला. या स्फोटाने जगातील सर्व अण्वस्त्रांपेक्षा जास्त ऊर्जा मुक्त झाली व पृथ्वीच्या आकाराचे काळे डाग गुरू ग्रहावर निर्माण झाले.
१९९५ - जनता दलाचे नेते व मालेगाव येथील आमदार निहाल अहमद यांना १९९४ चे ‘नॅशनल प्रेस ॲवॉर्ड’ जाहीर. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या  व्यक्तींना नॅशनल प्रेस ऑफ इंडियातर्फे हा पुरस्कार दिला जातो.
१९९६ - उद्योगपती गोदरेज यांना जपान सरकारतर्फे ‘दि ऑर्डर ऑफ राईझिंग सन, गोल्ड रेज अँड नेक रिबन पुरस्कार’ प्रदान.
२००१ - सांगलीच्या राजमाता पद्मिनीराजे माधवराव पटवर्धन यांचे निधन.

दिनमान -
मेष :
अपेक्षित पत्र व्यवहार होईल. मानसिक उत्साह वाढेल.उसनवारी वसूल होईल. 
वृषभ : उधारी, उसनवारी वसूल होईल. आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही.
मिथुन : तुमचे अनुभवाचे क्षेत्र वाढेल. बौद्धिक क्षेत्रात यश मिळेल.
कर्क : आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.
सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात विशेष यश मिळेल.
कन्या : व्यवसायात वाढ होईल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल.
तुळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे.
वृश्‍चिक : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. एखादी गुप्त बातमी समजणार आहे.
धनु : व्यवसाय वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.एखादी भाग्यकारक घटना घडेल.
मकर : वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे.  जबाबदारी वाढेल.
कुंभ : अपेक्षित पत्र व्यवहार व फोन होतील. तुमचे अंदाज अचूक ठरतील.
मीन : व्यवसायात वाढ होईल. तुमच्यावर विशेष जबाबदारी सोपवली जाईल.

Edited By - Prashant Patil