esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 18 सप्टेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
शुक्रवार - अधिक अश्‍विन शु.1, चंद्रनक्षत्र उत्तरा/हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 6.25, सूर्यास्त 6.34, चंद्रोदय स. 7.02, चंद्रास्त सायं. 7.39, भारतीय सौर 27, शके 1942.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 18 सप्टेंबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
शुक्रवार - अधिक अश्‍विन शु.1, चंद्रनक्षत्र उत्तरा/हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 6.25, सूर्यास्त 6.34, चंद्रोदय स. 7.02, चंद्रास्त सायं. 7.39, भारतीय सौर 27, शके 1942.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
२००२ - ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांचे निधन. भारतीय ज्ञानपीठाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘मूर्तिदेवी पुरस्कारा’चे मराठीतील ते एकमेव मानकरी आहेत. ‘मृत्युंजय’ या कादंबरीची गेल्या पस्तीस वर्षांत जवळजवळ प्रत्येक वर्षी आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे. इंग्रजी, कन्नड, गुजराती, हिंदी, बंगाली, उडिया, राजस्थानी, मल्याळम या भाषांमध्येही ही कादंबरी पोचली आहे. रशियन भाषेतही ही कादंबरी प्रसिद्ध झाली. या कादंबरीचे नाट्यरूपांतर झाले आणि त्याचे ८५० प्रयोग झाले. त्यांची छावा, लढत, संघर्ष, क्रांतिसिंहाची गावरान बोली, अशी मने असे नमुने, शेलका साज अशी त्यांची आणखी काही पुस्तके आहेत.  श्रीकृष्णाच्या चरित्रावर त्यांची ‘युगंधर’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली.
२००४ - प्रख्यात समीक्षक आणि लेखक डॉ. भालचंद्र दिनकर फडके यांचे निधन. दलित साहित्याचे समीक्षक ही त्यांची खास ओळख होती. दलित साहित्य - वेदना आणि विद्रोह, दलित साहित्याची प्रकाशयात्रा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चरित्र), फुले-आंबेडकर शोध आणि बोध, मराठी लेखिका - चिंता आणि चिंतन, समुद्रकाठची रात्र आदी पुस्तके त्यांनी लिहिली. ‘युगयात्री’ या नाटकाचे निवेदन त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत केले होते.

दिनमान -
मेष -
 आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने चालवताना काळजी घ्यावी. 
वृषभ - बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. काहींचे वैचारिक मत परिवर्तन होईल.
मिथुन - व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. नोकरीत तुमचा प्रभाव राहील.
कर्क - तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. 
सिंह - कौटुंबिक सौख्य लाभेल. एखादी गुप्त वार्ता समजेल. प्रवास सुखकर होतील.
कन्या - तुमची मते इतरांना पटवून द्याल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
तूळ - आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. अकारण एखादी चिंता लागून राहील.
वृश्‍चिक - संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. कला क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला जाईल.
धनू - नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. कीर्ती, नावलौकिक प्राप्त होईल.
मकर - नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. भाग्यकारक घटना घडतील. गुरुकृपा लाभेल.
कुंभ - आरोग्याची काळजी घ्यावी. कामाचा ताण व दगदग जाणवेल. मनोबल कमी राहील.
मीन - भागीदारी व्यवसायात यश. आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक सौख्य लाभेल.

Edited By - Prashant Patil