
पंचांग -
शुक्रवार : माघ शुद्ध ७, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय सकाळी ११.४६, चंद्रास्त रात्री १.०१, सूर्योदय ७.०१, सूर्यास्त ६.३५, रथसप्तमी, भीष्माष्टमी, भारतीय सौर माघ २९ शके १९४२.१९४२.
पंचांग -
शुक्रवार : माघ शुद्ध ७, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय सकाळी ११.४६, चंद्रास्त रात्री १.०१, सूर्योदय ७.०१, सूर्यास्त ६.३५, रथसप्तमी, भीष्माष्टमी, भारतीय सौर माघ २९ शके १९४२.१९४२.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दिनविशेष -
१९१५ : थोर नेते, महात्मा गांधींचे गुरू, सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे संस्थापक नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे निधन.
१९४६ : मुंबईत पाच हजार नौसैनिकांचा उठाव. ‘नाविकांचे बंड’ म्हणून ही घटना प्रसिद्ध आहे. या घटनेमुळे स्वातंत्र्याच्या प्रक्रियेला गती आली.
१९५६ :विख्यात गणिती, संशोधक, कायदेपंडित, धर्मशास्त्राचे अभ्यासक डॉ. केशव लक्ष्मण ऊर्फ भाऊजी दफ्तरी यांचे निधन.
१९७८ : प्रसिद्ध संगीतकार व गायक पंकजकुमार मलिक यांचे निधन.
१९९२ : चतुरस्र प्रतिभेचे श्रेष्ठ चित्रकार नारायण श्रीधर बेंद्रे यांचे निधन. त्यांच्या कार्याचा गौरव सरकारने त्यांना १९६९ मध्ये पद्मश्री तर १९९१ मध्ये पद्मभूषण देऊन केला.
१९९४ : मानवतेसाठी आणि हक्कांपासून वंचित राहिलेल्यांसाठी समर्पित वृत्तीने केलेल्या कार्याबद्दल डॉ. एन. एच. अँटिया यांना घनश्यामदास बिर्ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर.
२००३ : तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातींवर संपूर्णपणे बंदी घालण्याच्या विधेयकाला, केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
२००२ : ज्येष्ठ कामगार नेते, माजी राज्यमंत्री आणि विधान परिषदेचे विद्यमान सदस्य अरुण मेहता यांचे निधन.
२००५ : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. (महाराष्ट्र शासनमान्य)
दिनमान -
मेष : आर्थिक स्थिती अत्यंत चांगली राहणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल.
वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. उत्साह, उमेद वाढेल.खर्चाचे प्रमाण वाढेल.
मिथुन : काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
कर्क : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल.
सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
कन्या : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.
तुळ : व्यवसायात अडचणी जाणवतील. अचानक धनलाभाची शक्यता आहे.
वृश्चिक : कौटुंबिक सौख्य लाभेल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
धनु : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मकर : मुलामुलींच्या संदर्भात एखादी घटना घडेल. संततिसौख्य लाभेल.
कुंभ : नोकरीतील प्रश्न मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील.
मीन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.
Edited By - Prashant Patil