आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १९ जानेवारी २०२१

Bhavishya
Bhavishya

पंचांग -
मंगळवार : पौष शुद्ध ६, चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ७.११ सूर्यास्त ६.१९, चंद्रोदय सकाळी ११.२९, चंद्रास्त रात्री ११.५३, बांगर षष्ठी, भारतीय सौर पौष २८ शके १९४२.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष
१५९७ : इतिहासातील वीरपुरुष महाराणा प्रताप यांचे निधन. 
१७३६ : जेम्स वॅट या शास्त्रज्ञाचा जन्म. या शास्त्रज्ञाने वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध लावला.
१८९२ : प्रसिद्ध विनोदी लेखक व पाली भाषेचे अभ्यासक चिंतामण विनायक जोशी यांचा पुणे येथे जन्म.
१९५१ : महात्मा गांधींचे अनुयायी, थोर आदिवासी सेवक अमृतलाल विठ्ठल ठक्कर ऊर्फ ठक्करबाप्पा यांचे निधन.
१९५६ : देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा वटहुकूम. त्यांचेच एकत्रित स्वरूपात आयुर्विमा महामंडळ झाले.
१९६० : मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक दादासाहेब तोरणे यांचे निधन.
१९९० : तत्त्वज्ञ आचार्य रजनीश (ओशो) यांचे पुणे येथे निधन. 
१९९६ : प्रसिद्ध मल्याळी लेखक एम. टी. वासुदेवन नायर यांची १९९५ च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड.
१९९६ : तबलावादक उस्ताद अल्लारखा खाँ यांची शास्त्रीय संगीतासाठीच्या मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड.
२००० : प्रसिद्ध उद्योगपती आणि क्रीडाप्रशासक एम. ए. चिदंबरम यांचे निधन.

दिनमान
मेष :
आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
वृषभ : सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल.
मिथुन : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. मनोबल उत्तम राहील.
कर्क : तुमच्य कार्यक्षेत्रात सुुसंधी लाभेल. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील.
सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने चालवताना काळजी घ्यावी.
कन्या : प्रवास सुखकर होतील. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल.
तुळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.
वृश्‍चिक : अपेक्षित गाठीभेटी होतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.
धनु : कौटुंबिक सौख्य लाभेल. नोकरीत महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल.
मकर : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश. 
कुंभ : व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. 
मीन : प्रवास सुखकर होतील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com