esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 19 ऑक्टोबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya_73.jpg

पंचाग-

सोमवारः निज आश्विन शुद्ध 3, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्चिक, सूर्योदय 6.30, सूर्यास्त 6.07, चंद्रोदय सकाळी 8.57, चंद्रास्त रात्री 8.31, म. रबिलावल मासारंभ, भारतीय सौर आश्विन 27 शके 1942.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 19 ऑक्टोबर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचाग-

सोमवारः निज आश्विन शुद्ध 3, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्चिक, सूर्योदय 6.30, सूर्यास्त 6.07, चंद्रोदय सकाळी 8.57, चंद्रास्त रात्री 8.31, म. रबिलावल मासारंभ, भारतीय सौर आश्विन 27 शके 1942.

दिनमान-

मेष - आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.

वृषभ - जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. एखादी जबाबदारी येण्याची शक्यता आहे.

मिथुन - विरोधकांवर मात कराल. काहींना नैराश्य जाणवेल.

कर्क - मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. प्रवास सुखकर होतील.

सिंह - रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील.

कन्या - जिद्द व चिकाटी वाढविणारी एखादी घटना घडेल. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील.

तुळ - व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. प्रॉपर्टी व गुंतवणुकीची कामे मार्गी लावू शकाल.

वृश्‍चिक - आरोग्य उत्तम राहील. थोरामोठ्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल.

धनु - जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. वाहने सावकाश चालवा.

मकर - विविध लाभ होतील. संततिसौख्य लाभेल.

कुंभ - सामाजिक व राजकीय प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

मीन - नवनवीन सुसंधी लाभतील. काहींना गुप्त वार्ता समजण्याची शक्यता आहे.