आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १ फेब्रुवारी २०२१

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 February 2021

सोमवार : पौष कृष्ण ४, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय रात्री १०,  चंद्रास्त सकाळी ९.४९, सूर्योदय - ७.०९ , सूर्यास्त-६.२७, भारतीय सौर माघ ११ शके १९४२. 

पंचांग
सोमवार : पौष कृष्ण ४, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय रात्री १०,  चंद्रास्त सकाळी ९.४९, सूर्योदय - ७.०९ , सूर्यास्त-६.२७, भारतीय सौर माघ ११ शके १९४२. 

दिनविशेष
१८८४ : ‘ऑक्‍सफर्ड इंग्लिश डिक्‍शनरी’ या प्रचंड शब्दकोशाचा पहिला खंड प्रकाशित. तेव्हापासून ऑक्‍सफर्डच्या कोशांचे काम अव्याहतपणे चालूच आहे.
१९०४ : शिक्षणमहर्षी बा. रा. घोलप यांचा जन्म. ग्रामीण भागात शिक्षणप्रसार व्हावा, यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांनी सुरू केलेल्या ‘पुणे जिल्हा शिक्षण मंडळ’ या संस्थेतर्फे शाळा, महाविद्यालये अशा सुमारे शंभर संस्था शिक्षणप्रसार करीत आहेत.
१९४८ : विख्यात संशोधक अनंत काकबा प्रियोळकर यांच्या प्रेरणेतून मुंबई येथे मराठी संशोधन मंडळाची स्थापना.
२००३ : भारतात जन्मलेल्या अंतराळवीर कल्पना चावला यांच्यासह सात जणांचा समावेश असलेले ‘कोलंबिया’ अवकाशयान पृथ्वीवर उतरण्याच्या काही मिनिटे आधी कोसळून त्याचे तुकडे झाले.  त्यात या सर्व अंतराळवीरांचा मृत्यू झाला.
२००५ : ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांचा जन्म.

दिनमान    
मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. 
वृषभ : प्रियजनांचा सहवास लाभेल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.
मिथुन : प्रॉपर्टीचे व्यवहार मार्गी लावू शकाल. मानसिक प्रसन्नता लाभेल.
कर्क : नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
सिंह : व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल. लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
कन्या : आरोग्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.
तूळ : काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
वृश्‍चिक  : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील.
धनू : व्यवसायात उत्तम स्थिती राहील. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल.
मकर : काहींना गुरुकृपा लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
कुंभ : काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. प्रवासात काळजी घ्यावी.
मीन : आरोग्य उत्तम राहील. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल.
प्रा. रमणलाल शहा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: daily horoscope and panchang 1st feb 2021