esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 21 डिसेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 21 डिसेंबर

सोमवार : मार्गशीर्ष शुद्ध ७, चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा, चंद्रराशी कुंभ/मीन, सूर्योदय ७.०३ सूर्यास्त ६.०२, चंद्रोदय दुपारी १२.२३, चंद्रास्त रात्री १२.२५, उत्तरायणारंभ, मकरायन, सौर शिशिर ऋतू प्रारंभ, भारतीय सौर मार्गशीर्ष ३० शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 21 डिसेंबर

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

पंचांग
सोमवार : मार्गशीर्ष शुद्ध ७, चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा, चंद्रराशी कुंभ/मीन, सूर्योदय ७.०३ सूर्यास्त ६.०२, चंद्रोदय दुपारी १२.२३, चंद्रास्त रात्री १२.२५, उत्तरायणारंभ, मकरायन, सौर शिशिर ऋतू प्रारंभ, भारतीय सौर मार्गशीर्ष ३० शके १९४२.

दिनविशेष 
१९०९ - क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्‍सन याची गोळ्या घालून हत्या केली.
१९७९ - नामवंत इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक 
प्रा. नरहर रघुनाथ फाटक यांचे निधन.
१९९३ - ज्येष्ठ पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक मल्हार रंगनाथ ऊर्फ 
राजाभाऊ कुलकर्णी यांचे निधन.
१९९५ - राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचे (एमडीडीबी) अध्यक्ष डॉ. वर्गीस कुरियन यांना प्रतिष्ठेचा दादाभाई नौरोजी पुरस्कार प्रदान.
१९९६ - विख्यात पर्यावरणतज्ज्ञ डॉ. वंदना शिवा यांना प्रतिष्ठेचा 
‘गोल्डन प्लॅंट’ पुरस्कार जाहीर.

दिनमान
मेष : मित्रमैत्रिणींचा सल्ला लाभदायक ठरेल. शासकीय कामे मार्गी लागतील.
वृषभ : काहींना प्रवासाचे योग येतील. सार्वजनिक क्षेत्रात सहभागी होण्याची संधी लाभेल.
मिथुन : जिद्द व चिकाटी वाढविणारी एखादी घटना घडेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
कर्क : जुनी येणी वसूल होतील. वादविवाद टाळावेत. जिद्द व चिकाटी वाढेल.
सिंह : वैवाहिक जीवनात मतभेद संभवतो. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील.
कन्या : हाताखालील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
तुळ : संततीचे प्रश्‍न निर्माण होवू शकतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
वृश्‍चिक : गुंतवणुकीची कामे मार्गी लागतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.
धनु : महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.
मकर : आर्थिक सुयश लाभेल. उधारी, उसनवारी वसूल होईल.
कुंभ : आरोग्य उत्तम राहील. तुमची मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.
मीन : प्रवासात काळजी घ्यावी. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

प्रा. रमणलाल शहा

loading image