esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २१ फेब्रुवारी २०२१
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
रविवार : माघ शुद्ध ९, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ/मिथुन, चंद्रोदय दुपारी १.१०, चंद्रास्त रात्री २.४६, सूर्योदय ७.००, सूर्यास्त ६.३६, भारतीय सौर फाल्गुन २ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २१ फेब्रुवारी २०२१

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
रविवार : माघ शुद्ध ९, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ/मिथुन, चंद्रोदय दुपारी १.१०, चंद्रास्त रात्री २.४६, सूर्योदय ७.००, सूर्यास्त ६.३६, भारतीय सौर फाल्गुन २ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८९४ : प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ डॉ. शांतिस्वरूप भटनागर यांचा जन्म. भारताला विज्ञानयुगात नेण्यात त्यांची कामगिरी मोलाची होती. त्यांच्या नावाने तरुण शास्त्रज्ञांना दिला जाणारा पुरस्कार मानाचा समजला जातो.
१८९९ : ‘निराला’ या नावाने प्रसिद्ध असणारे कवी सूर्यकांत त्रिपाठी यांचा जन्म. कवितेत मुक्तछंदाचा वापर करण्याची प्रथा त्यांनी सुरू केली.
१९६९ : कंपॉझिट प्रॉपेलंट हे इंधन म्हणून वापरल्या गेलेल्या भारतातील पहिल्या अग्निबाणाचे तुंब्याहून यशस्वी उड्डाण झाले. मुख्य उद्दिष्ट अग्निबाणाच्या चलवेगात कंपॉझिट प्रॉपेलंटची अबाधितता तपासणे. या कसोटीत यशस्वी झालेला हा कंपॉझिट प्रॉपेलंट डॉ. वसंत गोवारीकर यांच्या नेतृत्वाखाली विकसित झाला. 
१९७० : पुणे विद्यापीठाचे कुलगुरू हरिभाऊ पाटसकर यांचे निधन. ते केंद्रीय कायदेमंत्री असताना ‘हिंदू कोड बिल’ सादर केले गेले. 
२००० : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रभाकर नारायण पाटील यांचे निधन.
२००४ : अवघ्या तीन मिनिटांत उजव्या हाताचा कस काढीत लपेट डावावर दिल्लीच्या जगदीश कालिरामने पुण्याच्या चंद्रहास निमगिरेला चारीमुंड्या चित केले आणि कोल्हापूर महापौर केसरीचा किताब पटकाविला.

दिनमान -
मेष :
उधारी, उसनवारी वसूल होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. 
वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल.
मिथुन : काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
कर्क : महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील. नवीन गाठीभेटी होतील.
सिंह : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
कन्या : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. प्रवास सुखकर होतील.
तूळ : खर्चाचे प्रमाण वाढेल. व्यवसायात अडचणी जाणवतील.
वृश्‍चिक : मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
धनू : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मकर : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. अंदाज अचूक ठरतील.
कुंभ : व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न सुटतील. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
मीन : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

Edited By - Prashant Patil