esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २२ फेब्रुवारी २०२१
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Horoscope

सोमवार : माघ शुद्ध १०, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.५९, सूर्यास्त ६.३६, चंद्रोदय दुपारी १.५९, चंद्रास्त पहाटे ३.४०, सूर्योदय - ६.५९,  सूर्यास्त - ६.३६ भारतीय सौर फाल्गुन ३ शके १९४२. 

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २२ फेब्रुवारी २०२१

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सोमवार : माघ शुद्ध १०, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.५९, सूर्यास्त ६.३६, चंद्रोदय दुपारी १.५९, चंद्रास्त पहाटे ३.४०, सूर्योदय - ६.५९,  सूर्यास्त - ६.३६ भारतीय सौर फाल्गुन ३ शके १९४२. 


दिनविशेष
१८५४ : कावसजी नानाभाई दावर यांनी मुंबईत पहिली कापडगिरणी सुरू केली. मुंबई ही कापड उद्योगाची राजधानी असली, तरी देशातील पहिली गिरणी मात्र नागपूरमध्ये सुरू झाली.
१८५७ : बालवीर चळवळीचे प्रणेते रॉबर्ट बेडन पॉवेल यांचा जन्म.
१९४४ : कस्तुरबा गांधी यांचे पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये निधन.
१९७४ : पाकिस्तानने बांगलादेशला मान्यता दिली.
१९९९ : पुण्याच्या काका पवारने इंफाळ येथील राष्ट्रीय स्पर्धेत कुस्तीतील सुवर्णपदक मिळविले. हे सुवर्णपदक मिळविण्याची त्याने हॅट्‌ट्रिक केली.
२००० : नवनव्या प्रयोगांसाठी ख्याती मिळवलेले ज्येष्ठ प्रकाशक व ‘श्रीविद्या प्रकाशन’चे संस्थापक मधुकाका कुलकर्णी यांचे निधन.
२००३ : पुणे विद्यापीठाच्या मानसशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागाचे माजी प्रमुख प्रा. सनतकुमार गंगासा भोरे यांचे निधन.

दिनमान
मेष : जिद्द व चिकाटी वाढेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. सुयश लाभेल.
वृषभ : आर्थिक कामास दिवस अनुकूल आहे. व्यवसायात उत्तम उलाढाल होईल.
मिथुन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कर्क : एखादा मनस्ताप संभवतो. भागीदारी निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.
सिंह : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. नवीन परिचय होतील.
कन्या : आरोग्य उत्तम राहील. सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मान लाभेल.
तूळ : तुमचे कार्यक्षेत्रात वाढणार आहे. जिद्द व चिकाटी वाढेल.
वृश्‍चिक  : वादविवाद टाळावेत. मानसिक अस्वस्थता राहील.
धनू : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
मकर : काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
कुंभ : संततीसंदर्भात काही प्रश्‍न निर्माण होतील. काहींची बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
मीन : मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
प्रा. रमणलाल शहा