esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 22 ऑक्टोबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
गुरुवार - निज आश्विन शुद्ध ६, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, सूर्योदय ६.३१, सूर्यास्त ६.०५, चंद्रोदय दुपारी १२.०५, चंद्रास्त रात्री ११.२०, सरस्वती पूजन, भारतीय सौर आश्विन ३० शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 22 ऑक्टोबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
गुरुवार - निज आश्विन शुद्ध ६, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, सूर्योदय ६.३१, सूर्यास्त ६.०५, चंद्रोदय दुपारी १२.०५, चंद्रास्त रात्री ११.२०, सरस्वती पूजन, भारतीय सौर आश्विन ३० शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९३३ - केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष विठ्ठलभाई पटेल यांचे निधन. सरदार वल्लभभाई पटेल यांचे ते थोरले बंधू होत.
१९६३ - पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले.
२००० - अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख कार्यवाह, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती अशोक मोतीलाल फिरोदिया यांचे निधन.
२००१ - देशाच्या महत्त्वाकांक्षी अवकाश कार्यक्रमात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या ‘पीएसएलव्ही -सी ३’ या ध्रुवीय उपग्रहवाहकाचे श्रीहरिकोटा येथील ‘शार’च्या तळावरून यशस्वी प्रक्षेपण.

दिनमान -
मेष :
तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. आरोग्य चांगले राहील. 
वृषभ : काहींना अचानक धनलाभ संभवतो. वाहने सावकाश चालवावीत.
मिथुन : भागीदारी व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल.जोडीदाराचा सल्ला लाभदायक. 
कर्क : हितशत्रुंच्या कारवाया हाणून पाडाल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
सिंह : संततीसंदर्भात एखादी चांगली घटना घडेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
कन्या : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडेल. शासकीय कामे मार्गी लागतील.
तुळ : काहींना सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
वृश्‍चिक : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक जीवनात सौख्य व समाधान लाभेल.
धनु : तुम्ही तुमची मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. भागीदारी व्यवसायात सुयश.
मकर : वेळ व पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्यावी.
कुंभ : नवनवीन संधी उपलब्ध होतील. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल.
मीन : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Edited By - Prashant Patil