आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २३ फेब्रुवारी २०२१

Bhavishya
Bhavishya

पंचांग -
मंगळवार : माघ शुद्ध ११, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय दुपारी २.५२, चंद्रास्त पहाटे ४.३३, सूर्योदय ६.५८, सूर्यास्त ६.३७, जया एकादशी, भारतीय सौर फाल्गुन ४ शके १९४२.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९०४ - इंडियन असोसिएशन ऑफ कल्टिव्हेशन ऑफ सायन्सेसचे संस्थापक महेंद्रलाल सरकार यांचे निधन. होमिओपॅथीच्या प्रचारासाठी त्यांनी १८६८ मध्ये ‘जर्नल ऑफ मेडिसीन’ हे नियतकालिक सुरू केले.
१९५२ - संसदेने कामगार भविष्य निर्वाह निधी विधेयक मंजूर केले.
१९५८ - थोर स्वातंत्र्यसेनानी आणि भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचे निधन. त्यांना १९९२ मध्ये मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला.
१९९३ - प्रसिद्ध हिंदी कवी व लेखक नरेश मेहता यांना भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर. 
१९९६ - कोकण रेल्वेच्या चिपळूण-खेड टप्प्यातील वाहतुकीचा शुभारंभ.
१९९७ - देशी बनावटीच्या, ‘पृथ्वी’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.
१९९८ - भारताचा माजी क्रिकेट कसोटीपटू रमण लांबा यांचे निधन.
२००० - वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक वासुदेवशास्त्री धुंडिराज तांबे यांचे निधन.

दिनमान -
मेष : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. मनोबल उत्तम राहील.
वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल.
मिथुन : मानसिक अस्वस्थता जाणवेल. वाहने चालवताना काळजी घ्यावी.
कर्क : प्रवास शक्‍यतो पुढे ढकलावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.
सिंह : मनोरंजनाकडे कल राहील. मित्रमैत्रिणींबरोबर सुसंवाद साधू शकाल.
कन्या : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
तुळ : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
वृश्‍चिक : नातेवाईकांसाठी खर्च कराल. मनोबल कमी राहील.
धनु : महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. लाभाचे प्रमाण चांगले राहील.
मकर : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कुंभ : वाहने चालवताना दक्षता घ्यावी. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.
मीन : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com