
पंचांग -
शनिवार : पौष शुद्ध १०, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ७.११ सूर्यास्त ६.२२, चंद्रोदय दुपारी १.५१, चंद्रास्त पहाटे ३.१०, भारतीय सौर माघ २ शके १९४२.
पंचांग -
शनिवार : पौष शुद्ध १०, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ७.११ सूर्यास्त ६.२२, चंद्रोदय दुपारी १.५१, चंद्रास्त पहाटे ३.१०, भारतीय सौर माघ २ शके १९४२.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दिनविशेष -
१८९७ : थोर देशभक्त आणि आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म.
१८९८ : पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे शिष्य, संगीत दिग्दर्शक शंकरराव व्यास यांचा जन्म.
१९१९ : प्रतिभावान नाटककार, कवी आणि विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांचे सावनेर येथे निधन.
१९५९ : नामवंत शिक्षणतज्ज्ञ आणि कायदेपंडित विठ्ठल नारायण चंदावरकर यांचे निधन.
१९९२ : ज्येष्ठ भक्तिसांप्रदायिक आणि ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक धुंडामहाराज देगलूरकर यांचे निधन.
१९९७ : प्रसिद्ध लेखक, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष अरुण आठल्ये यांचे निधन.
२००३ : ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र संघटनेचे अध्यक्ष पी.आर.ब्रह्मानंद यांचे निधन.
दिनमान -
मेष : आर्थिक स्थिती अत्यंत चांगली राहणार आहे. व्यवसायात धाडस करावे.
वृषभ : आरोग्य उत्तम राहील. उत्साह व उमेद वाढेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.
कर्क : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. संततिसौख्य लाभेल.
सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.
कन्या : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.
तुळ : व्यवसायात अडचणी जाणवतील. उधारी, उसनवारी वसूल होईल.
वृश्चिक : मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रवास सुखकर होतील.
धनु : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मकर : संततिसौख्य लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल.
कुंभ : नोकरीतील प्रश्न सुटतील. प्रॉपर्टीची कामेमार्गी लागतील.
मीन : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. सुसंधी लाभेल.
Edited By - Prashant Patil