esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 24 ऑगस्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
सोमवार - भाद्रपद शु. 6, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 6.20, सूर्यास्त 6.55, चंद्रोदय स.11.19, चंद्रास्त रा.11.12, भारतीय सौर 2, शके 1942.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 24 ऑगस्ट

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
सोमवार - भाद्रपद शु. 6, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 6.20, सूर्यास्त 6.55, चंद्रोदय स.11.19, चंद्रास्त रा.11.12, भारतीय सौर 2, शके 1942.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८७२ - साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण ऊर्फ तात्यासाहेब केळकर यांचा जन्म. टिळक तुरुंगवासात  असल्यामुळे त्यांनी १८९७ पासून ‘मराठा’ व ‘केसरी’चे संपादन केले. 
१८७५ - ब्रिटिश जलतरणपटू कॅप्टन मॅथ्यू वेब इंग्लिश खाडी पोहून जाण्यात यशस्वी.
१९२५ - थोर प्राच्यविद्या संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचे निधन.
१९३१ - ‘टर्बो’ इंजिनाद्वारे संचालित पहिल्या जेट विमानाची जर्मनीत यशस्वी चाचणी.
१९६६ - भारताचे जलतरणपटू मिहीर सेन यांनी जिब्राल्टरची सामुद्रधुनी पोहून पार केली. इंग्लिश खाडीसह इतर सात ठिकाणे त्यांनी पोहून पार केल्याने सर्व समुद्रात पोहण्याचा त्यांचा विक्रम झाला होता.
१९९३ - शतायुषी क्रिकेट महर्षी प्रा. दिनकर बळवंत देवधर यांचे निधन. प्रथम श्रेणीच्या सर्व सामन्यांत मिळून त्यांची कारकीर्द ६२ सामने, १०० डाव, ११ वेळा नाबाद, सर्वोच्च धावसंख्या २४६, शतके ९, एकूण धावा ३९५१ व सरासरी ४४.३९. १९६५ मध्ये भारत सरकारतर्फे त्यांना ‘पद्मश्री‘ व १९९१मध्ये ‘पद्मभूषण’ किताबाने सन्मानित करण्यात आले.

दिनमान -
मेष :
प्रवासात खबरदारी घ्यावी. वाहने चालवताना अधिक काळजी घ्यावी. 
वृषभ : एखादी मानसिक चिंता राहील. आरोग्य चांगले राहणार आहे. खर्च वाढणार आहेत. 
मिथुन : आर्थिक क्षेत्रात धाडस नको. मुलामुलींच्यासाठी जादा खर्च होणार आहे.  
कर्क : अनेकांचे सहकार्य मिळणार आहे. शासकीय कामात यश लाभेल. 
सिंह : व्यवसायात उत्तम स्थिती राहणार आहे. वाढ होणार आहे. नोकरीत बढतीची शक्यता आहे. 
कन्या : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. कामे मार्गी लागणार आहेत. 
तूळ : वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे. कामाचा ताण वाढणार आहे.  
वृश्‍चिक : अनेकांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. आरोग्याच्या तक्रारी जाणतील. 
धनू : कामाचा ताण व दगदग वाढेल. मुलामुलींच्या संदर्भात खर्च वाढणार आहे.
मकर : तुमचे निर्णय अचूक ठरणार आहेत. एखादी भाग्यकारक घटना घडेल. 
कुंभ : ज्यांना बदली हवी आहे त्यांनी प्रयत्न करायला हरकत नाही. अस्वास्थता जाणवेल.  
मीन : विरोधकावर मात कराल. मित्रांचे, नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. 

Edited By - Prashant Patil