esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : २४ जुलै
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : २४ जुलै

पंचांग -
शुक्रवार - श्रावण शु. 4, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय 6.11, सूर्यास्त 7.13, चंद्रोदय स.9.29, चंद्रास्त रा.10.24, भारतीय सौर 2, शके 1942.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : २४ जुलै

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
शुक्रवार - श्रावण शु. 4, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय 6.11, सूर्यास्त 7.13, चंद्रोदय स.9.29, चंद्रास्त रा.10.24, भारतीय सौर 2, शके 1942.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८९८ - विमानातून अटलांटिक महासागर पार करणाऱ्या पहिल्या महिला वैमानिक अमेलिया इयरहार्ट यांचा जन्म. 
१९११ - हैद्राबाद मुक्ती संग्रामातील झुंजार स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांचा जन्म.
१९११ - ख्यातनाम बासरीवादक पन्नालाल घोष यांचा जन्म.
१९३२ - अभिनेते, नाटककार, दिग्दर्शक आणि निर्माते अशा चतुर्विध भूमिकांमुळे मराठी नाट्यरसिकांच्या मनात स्वत:चे खास स्थान निर्माण केलेले ज्येष्ठ रंगकर्मी प्रा.मधुकर तोरडमल यांचा जन्म. 
१९७४ - ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक जेम्स चॅडविक यांचे निधन. अणुकेंद्रातील न्यूट्रॉन कणांच्या शोधाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले होते.
१९८० - बंगाली आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेते उत्तमकुमार यांचे निधन. त्यांचे मूळ नाव अरुणकुमार चटर्जी. त्यांनी तीनशेहून अधिक बंगाली व हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या व चार चित्रपट दिग्दर्शित केले.
१९९७ - ख्यातनाम बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांना पत्रकारिता, साहित्य व सर्जनशील संपर्क कला या माध्यमांतील कामगिरीसाठी ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर.

दिनमान -
मेष :
खर्चाचे प्रमाण वाढेल. मुलामुलींची प्रगती होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
वृषभ : कौटुंबिक सौख्य लाभेल. उत्साह, उमेद वाढेल.
मिथुन : बोलण्यात कटूता टाळावी. अडचणीवर मात कराल.
कर्क : आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही. व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.
सिंह : कामे गतिमानतेने पार पाडाल. शासकीय कामे पुढे ढकलावीत.
कन्या : कोणावरही अवलंबून राहू नका. तुमचे अंदाज अचूक ठरतील.
तुळ : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
वृश्‍चिक : हाती घेतलेल्या कामात यश लाभणार. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल.
धनु : परिस्थिती सुधारेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मकर : प्रॉपर्टीचे व्यवहार पुढे ढकलावेत. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे.
कुंभ : उधारी, उसनवारी वसूल होईल. हाती घेतलेल्या कामात यश लाभेल.
मीन : मुलामुलींकरिता जादा खर्च करावा लागेल. अडचणीवर मात कराल.

Edited By - Prashant Patil