esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 25 नोव्हेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 25 नोव्हेंबर

पंचांग -
बुधवार - कार्तिक शुद्ध ११, चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ६.४८ सूर्यास्त ५.५४, चंद्रोदय दुपारी २.५८, चंद्रास्त पहाटे ३.१९, प्रबोधिनी (स्मार्त) एकादशी, विष्णू प्रबोधोत्सव, भारतीय सौर मार्गशीर्ष ४ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 25 नोव्हेंबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
बुधवार - कार्तिक शुद्ध ११, चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ६.४८ सूर्यास्त ५.५४, चंद्रोदय दुपारी २.५८, चंद्रास्त पहाटे ३.१९, प्रबोधिनी (स्मार्त) एकादशी, विष्णू प्रबोधोत्सव, भारतीय सौर मार्गशीर्ष ४ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
मांसाहार वर्ज्य दिन । International Day for the Elimination of Violence against Women(UN)
१६६४ - शिवाजी महाराजांनी मालवणजवळ सिंधुदुर्ग हा सागरी किल्ला बांधण्यास प्रारंभ केला. या किल्ल्यामुळे जंजिऱ्याच्या सिद्दीला चांगलाच शह बसला.
१९४८ - विद्यार्थ्यांना लष्करी प्रशिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय छात्रसेना (एन.सी.सी.) ही योजना सुरू करण्यात आली.
१९८४ - भारताचे माजी उपपंतप्रधान  व आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार मानले जाणारे यशवंतराव चव्हाण यांचे निधन.
१९९४ - राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना कलकत्ता येथील ‘इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन’तर्फे देण्यात येणारा ‘राज क्रिस्टो दत्त स्मृती पुरस्कार’ जाहीर.
१९९९ - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना प्रतिष्ठेचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जाहीर.

दिनमान -
मेष :
दैनंदिन कामात अडचणी जाणवण्याची शक्‍यता आहे. धार्मिक कार्यात सहभाग राहील.
वृषभ : काहींना आर्थिक लाभाचे योग संभवतात. अपेक्षित गाठीभेटी होतील.
मिथुन : मनोबल उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रवास शक्‍यतो टाळावेत.
कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
सिंह : मनोबल कमी राहील. वादविवादात सहभाग टाळावा.खर्चाचे प्रमाण वाढेल.
कन्या : भागीदारी व्यवसायात जपून व्यवहार करावेत. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
तुळ : काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. अनपेक्षित एखादी खर्च होईल.
वृश्‍चिक : मुलामुलींच्या संदर्भात समस्या निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 
धनु : जिद्द राहील. मनोबल उत्तम राहील. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.
मकर : व्यवसायानिमित्त प्रवासाची शक्‍यता. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
कुंभ : कौटुंबिक सौख्य लाभेल. एखादी गुप्त वार्ता समजेल. उत्साह वाढेल.
मीन : प्रवासात दक्षता घ्यावी. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Edited By - Prashant Patil

loading image