esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 26 ऑगस्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
बुधवार - भाद्रपद शु. 8, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय 6.21, सूर्यास्त 6.54, दुर्गाष्टमी, चंद्रोदय दु.1.20, चंद्रास्त रा.11.59, भारतीय सौर 4, शके 1942.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 26 ऑगस्ट

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
बुधवार - भाद्रपद शु. 8, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय 6.21, सूर्यास्त 6.54, दुर्गाष्टमी, चंद्रोदय दु.1.20, चंद्रास्त रा.11.59, भारतीय सौर 4, शके 1942.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८६३ - लोकमान्य टिळकांचे सहकारी, राष्ट्रीय शिक्षणाचे अध्वर्यू, समर्थ विद्यालयाचे संस्थापक गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर यांचा जन्म.
१९१० - अनाथ व अपंगांच्या सेवेला वाहून घेणाऱ्या थोर समाजसेविका मदर तेरेसा यांचा जन्म. त्यांना १९७९ मध्ये ‘नोबेल पारितोषिक’ आणि १९८० मध्ये ‘भारतरत्न’ सन्मानाने गौरविले.
१९२२ - स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार, लेखक व विचारवंत प्रा. ग. प्र. प्रधान यांचा जन्म. स्वातंत्र्य संग्रामाचे महाभारत, लोकमान्य टिळक, हाजी पीर, सोनार बंगला, भाकरी आणि स्वातंत्र्य इ. त्यांची मराठीतील पुस्तके प्रसिद्ध आहेत.
१९४८ - नाटककार, ‘केसरी’चे संपादक, ‘नवाकाळ’चे संस्थापक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे निधन. कीचकवध, मानापमान, भाऊबंदकी, स्वयंवर, विद्याहरण आदी पंधरा नाटके त्यांनी लिहिली. 
१९५५ - मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक अ. ना. भालेराव यांचे निधन. चित्रपटाच्या लाटेमुळे मृतवत झालेल्या मराठी नाटकांना पुनरुज्जीवन देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.
२००४ - फार्सी - मराठी या भाषांसंदर्भात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ‘राष्ट्रीय भाषापंडित’ हा राष्ट्रपती पुरस्कार प्रा. डॉ. यु. म. पठाण यांना जाहीर. एक लाख रुपये, राष्ट्रपतींचे सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

दिनमान -
मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींना एखादा मनस्ताप संभवतो. 
वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. वैवाहिक जीवनात विशेष सुसंवाद राहील. 
मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा धार्मिक कार्याकडे कल राहील.
कर्क : महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष द्याल.  
सिंह : मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्य उत्तम राहील. सामाजिक क्षेत्रात प्रभाव राहील. 
कन्या : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. जिद्द व चिकाटी वाढणार आहे. उसनवारी वसूल होईल.
तूळ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. व्यवसायातील उलाढाल वाढेल. 
वृश्‍चिक : अस्वस्थता कमी होईल. मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.
धनू : मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.  
मकर : मित्रमैत्रिणींचे विशेष सहकार्य लाभेल. मुलामुलाींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल.  
कुंभ : सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. प्रतिष्ठा वाढेल.
मीन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील. प्रवास सुखद होतील.

Edited By - Prashant Patil