esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : २६ जून

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
शुक्रवार - आषाढ शु. ५-६, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ७.१५, चंद्रोदय स. १०.३७, चंद्रास्त रा. ११.४२, भारतीय सौर ५, शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : २६ जून
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
शुक्रवार - आषाढ शु. ५-६, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ७.१५, चंद्रोदय स. १०.३७, चंद्रास्त रा. ११.४२, भारतीय सौर ५, शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
मादक पदार्थ सेवनविरोधी दिन । आंतरराष्ट्रीय छळविरोधी दिन 
१८८८ - मराठी रंगभूमीवरील ख्यातनाम गायक, अभिनेते नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व यांचा जन्म. १८९८ मध्ये लोकमान्य टिळकांनी त्यांचे गाणे ऐकून ‘हा बालगंधर्व फार सुरेख गातो’ असे म्हटले, तेव्हापासून त्यांना ‘बालगंधर्व’ या नावाने ओळखले जाऊ लागले. 
१८९२ - विख्यात अमेरिकन लेखिका पर्ल बक यांचा जन्म. त्यांची ‘ईस्ट विंड वेस्ट विंड’ ही पहिली कादंबरी १९३० मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर प्रकाशित झालेल्या ‘द गुड अर्थ’ या कादंबरीने (१९३१) त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त करुन दिली. १९३२ मध्ये या कादंबरीला पुलित्झर पारितोषिक देण्यात आले. १९३८ मध्ये त्यांना साहित्याचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.
१९५० - सत्यशोधक समाजाचे नेते, बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत, व्यासंगी विद्वान भास्करराव विठोजीराव जाधव यांचे निधन. 
१९६८ - पुणे महापालिकेने उभारलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचे उद्‌घाटन.
१९९४ - वाईल्ड स्कीन (ग्रीन ऑस्कर) पुरस्कारासाठी माईक पांडे दिग्दर्शित ‘वाईल्ड एलिफंट कॅप्चर इन सर्गुजा’ या भारतीय चित्रपटाची शिफारस करण्यात आली. 
२००० - हवाई दलातील पहिल्या महिला अधिकारी पी.बंदोपाध्याय यांनी एअर कमोडोरपदाची सूत्रे हाती घेतली. हवाई दलातील पहिल्या महिला एअर कमोडोर बनण्याचा मान त्यांना मिळाला.
२००१ - आपल्या कथाकथनाने अवघ्या मराठी जनतेवर प्रभाव पाडणारे ज्येष्ठ मराठी साहित्यिक वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु.काळे यांचे निधन.

दिनमान -
मेष :
विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये गती लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
वृषभ : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल.
मिथुन : काहींना मुलामुलींच्या प्रगतीबाबत चिंता लागून राहील. आरोग्य चांगले राहील. 
कर्क : कौटुंबिक सौख्य लाभेल. भागीदारी व्यवसायातील प्रश्‍न सोडवू शकाल.
सिंह : आरोग्य चांगले राहील. आपला जनसंपर्क वाढेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
कन्या : महत्त्वाची कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. कौटुंबिक सौख्य लाभेल.  
तूळ : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत.
वृश्‍चिक : व्यवसायातील घडामोडींकडे लक्ष द्यावे. मानसिक समाधान लाभेल. 
धनू : काहींना सुसंधी लाभेल गुरुकृपा लाभेल. वरिष्ठांचे अपेक्षित मार्गदर्शन लाभेल.
मकर : अनावश्‍यक खर्च टाळावेत. काहींना मानसिक अस्वास्थ्य जाणवेल.
कुंभ : भागीदारी व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
मीन : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील, तर काहींचा आध्यात्मिक ओढा राहील.