आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 27 ऑगस्ट

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 August 2020

पंचांग -
गुरुवार ः भाद्रपद शु. 9, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय 6.21, सूर्यास्त 6.53, चंद्रोदय दु.1.20, चंद्रास्त रा.11.59, भारतीय सौर 6, शके 1942.

पंचांग -
गुरुवार ः भाद्रपद शु. 9, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय 6.21, सूर्यास्त 6.53, चंद्रोदय दु.1.20, चंद्रास्त रा.11.59, भारतीय सौर 6, शके 1942.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९०८ - श्रेष्ठ ऑस्ट्रेलियन फलंदाज, यशस्वी संघनायक, विक्रमवीर सर डोनाल्ड जॉर्ज ऊर्फ  डॉन ब्रॅडमन यांचा जन्म. त्यांना १९४९ मध्ये ‘सर’ हा किताब देण्यात आला. बाडरल या मैदानाला त्यांचे नाव देण्यात आले आहे.
१९१० - नामवंत इतिहाससंशोधक, प्रशासक, गॅझेटियर्सचे संपादक सेतुमाधवराव पगडी यांचा जन्म.
१९५५ - संतचरित्रकार जगन्नाथ रघुनाथ आजगावकर यांचे निधन. १९०७ ते १९३५ या काळात त्यांच्या ‘महाराष्ट्र कविचरित्रा’चे नऊ भाग प्रसिद्ध झाले. ‘मराठी आद्य कवी श्रीज्ञानदेव’, ‘श्रीसमर्थ चरित्र’ व ‘महाराष्ट्र संतकवयित्री’ हे त्यांचे अन्य ग्रंथ होत.
१९७६ - पार्श्वगायक मुकेश  यांचे निधन. त्यांचे पूर्ण नाव मुकेशचंद्र माथूर. आपल्या तीस वर्षांच्या फिल्मी जीवनात मुकेश यांनी दहा हजार गीतांना आवाज दिला. उर्दू, पंजाबी, तमीळ, बंगाली, मराठी, गुजराती या भाषेतही त्यांनी गाणी गायली. अनुनासिक स्वर आणि गायकीत ओतप्रोत भरलेला दर्द ही त्यांच्या गायनशैलीची वैशिष्ट्ये होती. 
१९७९ - भारतातील शेवटचे ब्रिटिश व्हॉईसरॉय व स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड लुई माऊंटबॅटन यांचे निधन.  त्यांच्या घराजवळ आयरिश दहशतवाद्यांनी केलेल्या बाँबस्फोटामध्ये त्यांना मृत्यू आला.
१९९५ - पुणे येथील केईएम रुग्णालयाच्या मेडिसीन विभागाचे संचालक व नामांकित हृदयरोगतज्ज्ञ डॉ.वसंत रामचंद्र पै यांचे निधन.

दिनमान
मेष :
नवनवीन संधी मिळतील. गुरुकृपा लाभेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
वृषभ : आरोग्याच्या तक्रारी राहतील. अचानक धनलाभाची शक्यता. वादविवादात सहभाग टाळावा.
मिथुन : भागीदारी व्यवसायात यश मिळेल. तुमचा उत्साह वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.
कर्क : हाताखालील कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. नोकरीत बढतीची शक्यता आहे.
सिंह : संततीच्या बाबतीत एखादी चांगली घटना घडेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आत्मविश्‍वास वाढेल.
कन्या : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. शैक्षणिक क्षेत्रात अडथळे येतील. आरोग्याच्या तक्रारी राहतील.
तूळ : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. कामानिमित्त छोटे प्रवास करावे लागतील.आजचा दिवस आनंदात जाईल.
वृश्‍चिक : अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक सौख्य लाभेल. ट्रान्स्पोर्ट क्षेत्रातील व्यक्तींना आजचा दिवस चांगला आहे.
धनू : आरोग्याच्या तक्रारी राहतील. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. अचानक खर्च उद्भवतील.
मकर : मानसिक अस्वस्थता जाणवेल. आपले म्हणणे इतरांना पटवून द्याल. कोर्ट-कचेरीची कामे पुढे ढकलावीत.
कुंभ : मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
मीन : हाती घेतलेले काम पूर्णत्वास जाईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. सामाजिक कार्यात प्रतिष्ठा लाभेल.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily Horoscope and Panchang of 27th August 2020