esakal | तुमच्या भविष्यात आज काय? जाणून घ्या राशीभविष्य!
sakal

बोलून बातमी शोधा

तुमच्या भविष्यात आज काय? जाणून घ्या राशीभविष्य!

पंचांग

बुधवार ः ज्येष्ठ शु.५ चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ५.५९ सूर्यास्त ७.०७, चंद्रोदय स. ०९.४४ चंद्रास्त रा. ११.२४, भारतीय सौर ६, शके १९४२.

तुमच्या भविष्यात आज काय? जाणून घ्या राशीभविष्य!

sakal_logo
By
प्रा. रमणलाल शहा

दिनविशेष 

१९३५ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई भीमराव आंबेडकर यांचे निधन. 
१९३८ - मराठीतील एक आघाडीचे कादंबरीकार, कवी, इंग्रजी व मराठी साहित्याचे विलक्षण अभ्यासक, मर्मग्राही समीक्षक डॉ. भालचंद्र वनाजी नेमाडे यांचा जन्म. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने  डी.लिट. देऊन त्यांचा सन्मान केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

१९६४ - स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन. १९५५ मध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार त्यांना देण्यात आला. भारत सरकारतर्फे आंतरराष्ट्रीय सामंजस्य व शांतता यासाठी नेहरू पुरस्कारासाठी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
१९८६ - प्रसिद्ध संगीत समीक्षक आणि संस्कृतचे अभ्यासक अरविंद मंगरुळकर यांचे निधन.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

२००१ - औरंगाबाद येथील सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील रुही वाघिणीवर कर्करोगावरील देशातील पहिलीच शस्त्रक्रिया करण्यात आली.
२००१ - कॅलाईस - मार्सेलिस हे १०६७ किलोमीटरचे अंतर केवळ साडेतीन तासांत पार करून फ्रेंच रेल्वेने वेगाचा एक नवा जागतिक विक्रम केला.

००४ -  इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

दिनमान

मेष : स्वास्थ्य लाभेल. आरोग्य चांगले राहील. उत्साहाने कार्यरत राहा
वृषभ : उत्साह व उमेद वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.निर्णय अचूक ठरतील. 
मिथुन : आरोग्य सुधारेल. आर्थिक लाभ होतील. मित्रांचे सहकार्य लाभेल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कर्क : आरोग्य उत्तम राहील. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.
सिंह : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. एखादी चिंता निर्माण होईल.
कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.
तुळ : आरोग्य सुधारेल. आत्मविश्‍वास वाढेल, जबाबदारी वाढेल.
वृश्‍चिक: उत्साह, उमेद वाढेल. नवी संधी लाभेल. एखादी चांगली घटना घडेल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

धनु : व्यवसायात प्रगती होईल. एखादी मानसिक चिंता राहील. नवीन कामे काढू नका.
मकर : कलाकारांना संधी मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेण्यास दिवस उत्तम आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कुंभ : उत्साह, उमेद वाढेल. अडचणी निर्माण होतील. खर्च वाढतील. 
मीन : जबाबदारी वाढेल. मानसिक उत्साह वाढेल. आरोग्य उत्तम राहील.