esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 27 नोव्हेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
शुक्रवार - कार्तिक शुद्ध १२, चंद्रनक्षत्र आश्विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.४९ सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय दुपारी ४.०५, चंद्रास्त पहाटे ४.५४, प्रदोष, फत्तेहयाजदहम, भारतीय सौर मार्गशीर्ष ६ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 27 नोव्हेंबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
शुक्रवार - कार्तिक शुद्ध १२, चंद्रनक्षत्र आश्विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.४९ सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय दुपारी ४.०५, चंद्रास्त पहाटे ४.५४, प्रदोष, फत्तेहयाजदहम, भारतीय सौर मार्गशीर्ष ६ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८७० : महाराष्ट्रातील नामवंत इतिहास संशोधक दत्तात्रेय बळवंत पारसनीस यांचा जन्म. त्यांनी लिहिलेली झाशीच्या राणीचे चरित्र व अयोध्येच्या नबाबांची चरित्रे अपूर्व मानली जातात.
१८८१ :  प्रसिद्ध प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ज्ञ काशिप्रसाद जयस्वाल यांचा जन्म.
१९०७ : विख्यात हिंदी कवी डॉ. हरिवंशराय बच्चन यांचा जन्म.
१९१५ : साहित्यिक दि. बा. मोकाशी यांचा जन्म. त्यांचे संपूर्ण नाव दिगंबर बाळकृष्ण मोकाशी. 
१९९४ : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, समाजवादी विचारवंत आणि रायगड मिलिटरी स्कूलचे संस्थापक दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित यांचे निधन.
१९९५ : ‘गझलांच्या दुनियेतील स्वामी’ तलत मेहमूद यांना मध्य प्रदेश सरकारचा ‘लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर.
१९९६ : आकाशवाणीवरील वृत्तनिवेदक नंदकुमार कारखानीस यांचे निधन.

दिनमान -
मेष :
आरोग्य उत्तम राहील. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडेल.
वृषभ : अनावश्‍यक कारणांसाठी वेळ व पैसा खर्च होण्याची शक्‍यता आहे. 
मिथुन : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
कर्क : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
सिंह : नवनवीन सुसंधी लाभतील. प्रवासाचे योग येतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.
कन्या : काहींना दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. प्रवास शक्‍यतो टाळावेत.
तुळ : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. आरोग्य उत्तम राहील.
वृश्‍चिक : मनोबल कमी राहील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
धनु : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
मकर : व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय मार्गी लावू शकाल. आरोग्य उत्तम राहील.
कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.
मीन : कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

Edited By - Prashant Patil

loading image