esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 28 एप्रिल 2021

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 28 एप्रिल 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

बुधवार : चैत्र शुद्ध २, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्चिक, चंद्रोदय रात्री ८.२४, चंद्रास्त सकाळी ७.०३, सूर्योदय ६.१०, सूर्यास्त ६.५४, भारतीय सौर वैशाख ८ शके १९४३.

दिनविशेष -

१९०० : ज्येष्ठ गांधीवादी नेते, राष्ट्रीय संस्कृत पंडित, पुण्यातील अनेक संस्थांचे आधारस्तंभ आचार्य विष्णु प्रभाकर लिमये यांचा जन्म.

१९९२ : नामवंत कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ व इंग्रजी वाङ्मयाचे गाढे अभ्यासक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, डॉ. विनायक कृष्ण गोकाक यांचे निधन.

१९९६ : ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते, पुण्याचे माजी महापौर निळकंठ वामन ऊर्फ निळूभाऊ लिमये यांचे निधन.

१९५५ : अस्पृश्‍यतेला कायद्याने बंदी करण्याचे विधेयक लोकसभेत मंजूर.

२००० : मुंबईतील ज्येष्ठ अस्थी शल्यचिकित्सक डॉ. के. टी. ढोलकिया यांची रामेश्वरदास बिर्ला राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड.

दिनमान -

मेष : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे.

वृषभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.

मिथुन : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कर्क : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. संततीचे प्रश्‍न निर्माण होतील.

सिंह : जिद्द व चिकाटी वाढेल. आर्थिक सुयश लाभेल.कामात सुयश लाभेल.

कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

तुळ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. उधारी, उसनवारी वसूल होईल.

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे दुपारी करावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

धनु : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. वैवाहिक जीवनात विसंवाद संभवतात.

मकर : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करावेत.

कुंभ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. दैनंदिन कामात सुयश लाभेल.

मीन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. काहींना गुरूकृपा लाभेल.