
पंचांग -
गुरुवार : पौष शुद्ध १५, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय सायंकाळी ६.०५, चंद्रास्त सकाळी ७.३६, सूर्योदय ७.१०, सूर्यास्त ६.२५, माघस्नानारंभ, शाकंभरी पौर्णिमा, शाकंभरी देवी नवरात्र समाप्ती, गुरुपुष्यामृत सूर्योदयापासून उत्तर रात्री ३.५० पर्यंत, पौर्णिमा समाप्ती उत्तर रात्री १२.४६, भारतीय सौर माघ ७ शके १९४२.
पंचांग -
गुरुवार : पौष शुद्ध १५, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय सायंकाळी ६.०५, चंद्रास्त सकाळी ७.३६, सूर्योदय ७.१०, सूर्यास्त ६.२५, माघस्नानारंभ, शाकंभरी पौर्णिमा, शाकंभरी देवी नवरात्र समाप्ती, गुरुपुष्यामृत सूर्योदयापासून उत्तर रात्री ३.५० पर्यंत, पौर्णिमा समाप्ती उत्तर रात्री १२.४६, भारतीय सौर माघ ७ शके १९४२.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दिनविशेष -
१८६५ - पंजाबचे सिंह म्हणून ओळखले जाणारे आणि लाल, बाल, पाल या त्रयींतील लाला लजपतराय यांचा जन्म. सायमन कमिशनच्या विरोधातील निदर्शनांच्या वेळी झालेल्या लाठीहल्ल्यातील मारामुळे त्यांना मृत्यू आला.
१९०० - भारताचे पहिले सरसेनापती जनरल के. एम. करिअप्पा यांचा जन्म. दुसऱ्या महायुद्धात ब्रिगेडचे नेतृत्व करणारे ते पहिले भारतीय अधिकारी होते. पुढे त्यांना फील्ड मार्शल हे सर्वोच्च पद देण्यात आले.
२००२ - महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विश्वस्त श्रीमती तारा सदानंद शास्त्री यांचे निधन. युनिसेफ आणि महिला बालकल्याण मध्ये समन्वयक म्हणून त्यांनी मोलाची कामगिरी बजावली.
२००३ - कविता, ललित गद्य, भाषांतर आणि समीक्षा अशी वैशिष्ट्यपूर्ण साहित्यनिर्मिती करणारे ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ‘जनस्थान पुरस्कार’ जाहीर.
दिनमान -
मेष : तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल. व्यवसायाच्या जागेचे प्रश्न मार्गी लावू शकाल.
वृषभ : जिद्दीने कार्यरत रहाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.
मिथुन : व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. आर्थिक लाभ होतील.
कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. अनेकांबरोबर सुसंवाद साधाल.
सिंह : मनोबल कमी राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.आर्थिक कामे मार्गी लागतील.
कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील.
तुळ : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.
वृश्चिक : कामे मार्गी लावू शकाल. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.
धनु : कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. शासकीय कामे पुढे ढकलावीत.
मकर : उत्साह वाढेल. दैनंदिन कामे यशस्वी होतील.नोकरीत चांगली स्थिती राहील.
कुंभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना विरोधकांचा त्रास संभवतो.
मीन : व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील. महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील.
Edited By - Prashant Patil