esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 29 सप्टेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
मंगळवार - अधिक अश्‍विन शु.13, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.27, सूर्यास्त 6.24, प्रदोष, चंद्रोदय सायं. 5.09, चंद्रास्त प.4.14, भारतीय सौर 7, शके 1942.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 29 सप्टेंबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
मंगळवार - अधिक अश्‍विन शु.13, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.27, सूर्यास्त 6.24, प्रदोष, चंद्रोदय सायं. 5.09, चंद्रास्त प.4.14, भारतीय सौर 7, शके 1942.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८९० ः पंचांगकर्ते ल. गो. ऊर्फ नानाशास्त्री दाते यांचा जन्म. जुने पंचांग म्हणून प्रसिद्ध असलेल्या दाते पंचांगाचे संस्थापक. त्यांनी पंचांग गणित पद्धतीत सूक्ष्मता व अचूकता आणली.
१९०८ : पदार्थ वैज्ञानिक एन्रिको फर्मी यांचा जन्म. न्यूट्रॉन कणांवरील मूलभूत संशोधनासाठी नोबेल पुरस्कार प्राप्त.
१९३२ : मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक व साहित्यिक हमीद दलवाई यांचा जन्म.
१९६६ : नामवंत कायदेपंडित, मद्रासचे कायदामंत्री, गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून काम पाहिलेले सर सी. पी. रामस्वामी अय्यर यांचे निधन. लंडनमध्ये भरलेल्या गोलमेज परिषदेत सभासद या नात्याने त्यांनी काम केले. त्रावणकोर, अन्नमलई व बनारस विद्यापीठांचे ते कुलगुरू होते.
१९९७ : ‘इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट’ (आयआरएस-१ डी) या भारतातील पहिल्या अतिप्रगत दूरसंवेदक उपग्रहाचे ‘पीएसएलव्ही-सी १’ या ध्रुवीय उपग्रह वाहकाद्वारे श्रीहरिकोटा येथील शार तळावरून यशस्वी प्रक्षेपण.
२००१ : राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते ऑल इंग्लंड विजेता पी. गोपीचंद याला सर्वोच्च प्रतिष्ठेचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान.

दिनमान -
मेष :
शेअर मार्केटचा अंदाज घेवून गुंतवणूक कराल. मनोरंजनाकडे कल राहील. 
वृषभ : नोकरी, व्यवसायात अस्थिरता जाणवेल. सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल. 
मिथुन : कला क्षेत्रातील व्यक्तींना सुयश लाभेल. काहींना गुरूकृपा लाभेल. सौख्य लाभेल.
कर्क : मानसिक अस्वस्थता जाणवेल. गुप्त वार्ता कळेल. आर्थिक क्षेत्रात धाडस नको.
सिंह : उत्साह व उमेद वाढेल. आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. 
कन्या : कर्ज प्रकरणे पुढे ढकलावीत. धार्मिक कार्यासाठी खर्च होईल. खर्च वाढेल.
तुळ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. संततिसंदर्भात एखादी चांगली घटना घडेल. 
वृश्‍चिक : कौटुंबिक सौख्य लाभेल. गुंतवणुकीस आजचा दिवस चांगला आहे.
धनु : मानसिक अस्वस्थता जाणवेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. छोटे प्रवास होतील. 
मकर : आर्थिक चढ-उतार जाणवतील. कुटुंबासाठी वेळ व पैसा खर्च होईल. 
कुंभ : वैवाहिक जीवन सुखकर राहील. भागीदारीत गुंतवणुकीस दिवस चांगला आहे. 
मीन : धार्मिक कार्यासाठी खर्च होईल. आत्मविश्‍वासाचा अभाव राहील.

Edited By - Prashant Patil