आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 2 नोव्हेंबर

dinman sakal main.jpg
dinman sakal main.jpg

पंचांग
सोमवार : निज आश्विन कृष्ण २, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.३५, सूर्यास्त ६, चंद्रोदय सायंकाळी ७.१९, चंद्रास्त सकाळी ७.४८, भारतीय सौर कार्तिक ११ शके १९४२.

दिनविशेष - 2 नोव्हेंबर


औद्योगिक सुरक्षा दिन
1780 : पंजाबातील पराक्रमी वीर पुरुष व शिखांच्या साम्राजाचे संस्थापक महाराणा रणजितसिंह यांचा जन्म.
1871 : मनोरंजन मासिकाचे संपादक काशिनाथ रघुनाथ मित्र यांचा जन्म.
1882 : महाराष्ट्रातील आधुनिक जादूगारांचे आचार्य म्हणून ओळखले जाणारे डॉ. के. बी. लेले यांचा जन्म. त्यांनीच पहिली जादूची शाळा सुरू केली. जादूविद्येवर अनेक पुस्तके लिहिली आणि सप्रयोग व्याख्याने देऊन जादूविद्येचा प्रसार केला.
1897 : नाट्य-चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते सोहराब मेहेरबानजी मोदी यांचा जन्म. "मिनर्व्हा मूव्हीटोन'तर्फे त्यांनी चाळीसहून अधिक चित्रपट निर्माण केले असून, या चित्रपटाचे दिग्दर्शन केले व 26 चित्रपटांतून भूमिका केल्या. 1979 मध्ये त्यांना "दादासाहेब फाळके पुरस्कार' प्रदान करण्यात आला.
1921 : ध्वनिमुद्रणतज्ज्ञ रघुवीर दाते यांचा जन्म. हिंदी, मराठी, गुजराती आणि उडिया भाषांतील सुमारे चाळीस चित्रपटांचे ध्वनिमुद्रण त्यांनी केले.
1959 : नामवंत अर्थतज्ज्ञ व माजी अर्थमंत्री डॉ. जॉन मथाई यांचे निधन.
1982 : महर्षी अण्णासाहेब कर्वे यांनी स्थापन केलेल्या महिला विद्यापीठाच्या पहिल्या पदवीधर सीताबाई अण्णेगिरी यांचे निधन.
1990 : प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक, महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील एक प्रमुख शिल्पकार भालचंद्र दिगंबर ऊर्फ आबासाहेब गरवारे यांचे निधन. सरकारने "पद्मभूषण' व पुणे विद्यापीठाने "डी.लिट.' देऊन त्यांचा गौरव केला.
1991 : प्रसिद्ध मराठी संगीतकार अरुण पौडवाल यांचे निधन.
1994 : कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणाऱ्या कपिलदेव निखंजची आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रातून निवृत्ती जाहीर. निवृत्त होताना त्यांनी आपल्या नावावर 434 बळी आणि 5248 धावा जमा करून या शतकातील एक सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून नाव मिळविले.
1999 : मध्य प्रदेश सरकारने लता मंगेशकर पुरस्कारासाठी प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांची निवड केली. सुगम संगीतातील असाधारण कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो.
2000 : "लक्ष्य' या मनुष्यरहित हवाईयानाची चंडीपूर येथे घेण्यात आलेली चाचणी यशस्वी.
2003 : माजी शिक्षणमंत्री प्रा. रामकृष्ण सदाशिवराव मोरे यांचे निधन. शिक्षणमंत्री असताना पहिलीपासून इंग्रजी शिकविण्याचा निर्णय त्यांनी निग्रहाने राबविला. विधिमंडळात राजकीय किंवा सामाजिक प्रश्नांवर त्यांनी केलेली अनेक भाषणे दीर्घकाळ लक्षात राहण्याजोगी होती. कारण त्यात केवळ राजकीय अभिनिवेश नव्हता तर परिस्थितीचे योग्य मूल्यमापन करून मांडलेले विचार होते.


दिनमान-
मेष- वैवाहिक सौख्य लाभेल. व्यवसायात उत्तम स्थिती. आर्थिक व्यवहार पुढे ढकलावेत.
वृषभ- आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वेळ व पैसा खर्च होण्याची शक्यता आहे.
मिथुन- मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
कर्क- व्यवसायात उत्तम स्थिती राहील. गुंतवणुकीची कामे मार्गी लागतील.
सिंह- तुमच्या कार्यक्षेत्रात नवीन संधी लाभतील. मानसिक अस्वस्थता कमी होईल.
कन्या- प्रवास शक्यतो टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल. जिद्द व चिकाटी वाढेल. 
तुळ- भागीदार व्यवसायात सुसंधी लाभेल. प्रवास सुखकर होतील. 
वृश्चिक- हाताखालील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.
धनू- आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकार राहील. प्रियजनांचा सहवास लाभेल.
मकर- कौटुंबिक सौख्य लाभेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
कुंभ- जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. 
मीन- तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com