esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 30 ऑगस्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
रविवार - भाद्रपद शु. 12, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.51, प्रदोष, चंद्रोदय दु.1.20, चंद्रास्त रा.11.59, भारतीय सौर 9, शके 1942.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 30 ऑगस्ट

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
रविवार - भाद्रपद शु. 12, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.51, प्रदोष, चंद्रोदय दु.1.20, चंद्रास्त रा.11.59, भारतीय सौर 9, शके 1942.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८५० - प्राच्यविद्यासंशोधक, कायदेपंडित, काँग्रेसचे एक संस्थापक न्यायमूर्ती काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचा जन्म. हिंदू कायद्यात सुधारणा होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी इंग्रजीत गीतेचा अनुवाद केला.
१८८३ - योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ज्ञ स्वामी कुवलयानंद यांचा जन्म. त्यांचे पूर्ण नाव जगन्नाथ गणेश गुणे. त्यांनी १९२४ मध्ये कैवल्यधाम नावाची योगशिक्षणसंस्था स्थापन केली. संस्थेतील प्रयोगांची माहिती व्हावी यासाठी त्यांनी ‘योगमीमांसा’ हे त्रैमासिक काढले. त्याचे सात खंड प्रकाशित झाले आहेत. 
१९०३ - हिंदी कादंबरीकार, कथाकार व कवी भगवतीचरण वर्मा यांचा जन्म. ‘मधुकर’ हा काव्यसंग्रह, ‘पतन’ ही कादंबरी. त्यांच्या ‘चित्रलेखा’ या सुमारे दोन लाख खप झालेल्या कादंबरीच्या आधारे चित्रपट तयार करण्यात आला. 
१९३० - ख्यातनाम संगीतकार व भावगीत गायक दशरथ पुजारी यांचा जन्म. पुजारी यांनी भावगीत, भक्तिगीत, अभंग, लावण्या, नाट्यगीते, समरगीते अशा विविध गानप्रकारांवर स्वतःची स्वरमुद्रा उमटवलेली आहे. 
१९४७ - ‘बी’ या टोपणनावाने प्रसिद्ध कवी नारायण मुरलीधर गुप्ते यांचे निधन. त्यांची ‘चाफा बोलेना चाफा चालेना’ ही कविता अतिशय प्रसिद्ध आहे.
१९८१ - ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक यांचे निधन. स्वतंत्र भारतामध्ये प्रथमच स्थापन केल्या गेलेल्या शैक्षणिक आयोगाचे (१९६४ ते १९६६) ते सभासद सचिव होते.
१९९२ - सर्जी बुब्काने इटली येथे इंडस्ट्री ट्रॉफी मैदानी स्पर्धेत पोलव्हॉल्टमध्ये ६.१२ मीटर उंच उडी मारून नव्या विश्‍वविक्रमाची नोंद केली.
१९९४ - प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी आणि पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख  डॉ. शं. गो. तुळपुळे यांचे निधन.
१९९८ - ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, निर्भीड पत्रकार आणि काँग्रेसचे तत्त्वनिष्ठ नेते नरुभाऊ लिमये यांचे निधन.
२००३ - भारतीय संसदेवरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि ‘जैश-ए-मोहंमद’ या अतिरेकी संघटनेचा म्होरक्‍या गाझीबाबा याला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी तब्बल दहा तास चाललेल्या चकमकीनंतर श्रीनगर येथील नूरबाग परिसरात ठार केले.
२००३ - भारताच्या अंजू बॉबी जॉर्जने पॅरिसमधील जागतिक मैदानी स्पर्धेत लांब उडीत ब्राँझ पदक मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली. 

दिनमान -
मेष :
नोकरी, व्यवसायात अडचणी येतील. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल.
वृषभ : तुम्हाला गुरुकृपा लाभेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.
मिथुन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. शैक्षणिक क्षेत्रात अडचणी निर्माण होतील.
कर्क : वादविवादात टाळावेत. मानसिक स्वास्थ्य लाभेल. प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत.
सिंह : अचानक धनलाभाची शक्यता आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
कन्या : संततीच्या संदर्भात अडचणींची शक्यता. शैक्षणिक क्षेत्रात अडथळे येतील. 
तूळ : प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत. कौटुंबिक वादविवाद टाळावेत.
वृश्‍चिक : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. कामानिमित्त छोेटे प्रवास होतील. 
धनू : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. आरोग्य उत्तम राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल.
मकर : आत्मविश्‍वास वाढेल. तुमचे निर्णय अचूक ठरतील. वादविवाद शक्यतो टाळावेत.
कुंभ : आरोग्याच्या तक्रारी राहतील. उधार देऊ नये. वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे. 
मीन : एखादे अधिकारपद मिळेल. आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.

Edited By - Prashant Patil