esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 30 ऑक्टोबर
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 30 ऑक्टोबर

पंचांग -
शुक्रवार - निज आश्विन शुद्ध १४, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, सूर्योदय ६.३४, सूर्यास्त ६.०१, चंद्रोदय सायंकाळी ५.२९, चंद्रास्त सकाळी ६.१०, कोजागरी पौर्णिमा, शरद पौर्णिमा, (पौर्णिमा प्रारंभ सायंकाळी ५.४५), रात्री लक्ष्मी व इंद्र पूजन, ईद-ए-मिलाद, भारतीय सौर कार्तिक ८ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 30 ऑक्टोबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
शुक्रवार - निज आश्विन शुद्ध १४, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, सूर्योदय ६.३४, सूर्यास्त ६.०१, चंद्रोदय सायंकाळी ५.२९, चंद्रास्त सकाळी ६.१०, कोजागरी पौर्णिमा, शरद पौर्णिमा, (पौर्णिमा प्रारंभ सायंकाळी ५.४५), रात्री लक्ष्मी व इंद्र पूजन, ईद-ए-मिलाद, भारतीय सौर कार्तिक ८ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
जागतिक काटकसर दिन

१९०९ - अणू व अवकाश संशोधन कार्यक्रमाचे प्रमुख शिल्पकार व भौतिकशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा जन्म.
१९२८ - सायमन कमिशनच्या लाहोर आगमनप्रसंगी निदर्शने, लाठीहल्ल्यात लाला लजपतराय जबर जखमी. या जखमांमुळेच लालाजींचा मृत्यू झाला.
१९९९ -  व्यंगचित्रकार वसंत हळबे यांचे निधन.
२००३ - भारतीय महिला हॉकी संघाने दक्षिण आफ्रिकेचा टायब्रेकरवर ५-४ असा पराभव करून आफ्रो-आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.

दिनमान -
मेष :
आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. जिद्द वाढेल.
वृषभ : अनपेक्षित एखादा मोठा खर्च संभवतो. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.
मिथुन : महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. प्रियजनांचा सहवास लाभेल. गुप्त वार्ता समजेल.
कर्क : प्रॉपर्टीचा विचारविनिमय करू शकाल. नोकरीतील प्रश्‍न मार्गी लावू शकाल.
सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित सुसंधी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
कन्या : प्रवास शक्यतो टाळावेत. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. जिद्द वाढेल.
तुळ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. दैनंदिन कामात सुयश लाभेल.
वृश्‍चिक : वाहने चालवताना दक्षता घ्यावी. प्रवासात काळजी घ्यावी.
धनु : अपेक्षित सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील.इतरांवर प्रभाव राहील.
मकर : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. इतरांवर प्रभाव राहील. प्रवास सुखकर होतील.
कुंभ : आरोग्य उत्तम राहील. आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.
मीन : आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबिक जीवनात एखादी आनंददायी घटना घडेल.

Edited By - Prashant Patil