esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ४ फेब्रुवारी २०२१
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Horoscope

गुरुवार : पौष कृष्ण ७, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, चंद्रोदय रात्री १२.५५, चंद्रास्त सकाळी ११.५२, कालाष्टमी, सूर्योदय- ७.०८, सूर्यास्त - ६.२८, भारतीय सौर माघ १४ शके १९४२. 

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ४ फेब्रुवारी २०२१

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

गुरुवार : पौष कृष्ण ७, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, चंद्रोदय रात्री १२.५५, चंद्रास्त सकाळी ११.५२, कालाष्टमी, सूर्योदय- ७.०८, सूर्यास्त - ६.२८, भारतीय सौर माघ १४ शके १९४२. 


दिनविशेष
१६७० - मोगलांच्या ताब्यात असलेला कोंडाणा किल्ला जिंकून घेताना झालेल्या लढाईत तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले.
१८९३ - महाराष्ट्रीय ज्ञानकोशातील डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे सहकारी चिंतामण गणेश कर्वे  यांचा जन्म. ज्ञानकोशाचे काम संपल्यावर त्यांनी आणि य. रा. दाते यांनी स्वतंत्रपणे महाराष्ट्र शब्दकोश आणि सुलभ विश्वकोश अशी मोठी कामे पूर्ण केली.
२००४ - छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, माजी मंत्री अभयसिंहराजे भोसले यांचे निधन.
२००५ - किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. भीमसेन जोशी यांचा आज ८३ वा वाढदिवस.


दिनमान
मेष : दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
वृषभ : प्रियजनांसाठी खर्च करावा लागेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
मिथुन : संततिसंदर्भात प्रश्‍न निर्माण होतील. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.
कर्क : प्रॉपर्टी व गुंतवणुकीच्या संदर्भात काही नवीन प्रस्ताव समोर येतील. 
सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
कन्या : उधारी, उसनवारी वसूल होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
तुळ : आजचा दिवस अनेक दृष्टीने चांगला जाईल. दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल.
वृश्‍चिक  : नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता.
धनु : अनेकांचे सहकार्य लाभेल. वरिष्ठांची कृपा लाभेल.
मकर : व्यवसायामध्ये प्रगतीचे वातावरण राहील. नवी दिशा सापडेल.
कुंभ : प्रवासात काळजी घ्यावी. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
मीन : कौटुंबिक जीवनात काहींना एखादी चिंता लागून राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
प्रा. रमणलाल शहा