आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 4 ऑगस्ट

Bhavishya
Bhavishya

पंचांग -
मंगळवार - श्रावण कृ. 1, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.15, सूर्यास्त 7.08, चंद्रोदय सायं. 7.53, चंद्रास्त स.6.39, भारतीय सौर 13, शके 1942.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८४५ - काँग्रेसचे एक संस्थापक, नामांकित वकील, उत्तम प्रशासक, प्रखर राष्ट्रवादी नेते फिरोजशहा मेहता यांचा जन्म. १९१३ मध्ये ‘बाँबे क्रॉनिकल’ हे इंग्रजी भाषेतील पहिले राष्ट्रीय बाण्याचे वृत्तपत्र त्यांनी मुंबईला सुरू केले.
१९२३ - नागपूर विद्यापीठाची स्थापना.
१९५६ - ‘अप्सरा’ ही भारताची पहिली अणुभट्टी तुर्भे येथील भाभा अणुसंशोधन केंद्रात कार्यान्वित.
२००१ - ‘मरणोत्तर त्वचादान’ करून दुसऱ्यांना जीवनदान देणारी भारतातील पहिली ‘स्कीन बॅंक’ मुंबईतील लोकमान्य टिळक रुग्णालयात स्थापन. 
२००२ -  वैद्यकीय व ललित विषयांवर विपुल लेखन करणाऱ्या ज्येष्ठ लेखिका, डहाणूकर उद्योगसमूहाच्या अध्यक्षा व नायर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्री डॉ. शरदिनी डहाणूकर यांचे निधन.
२००४ - ‘नासा’ने आपल्या ‘अल्टेक्‍स ३०००’ या महासंगणकाला भारतीय अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव देण्याचे ठरविले.

दिनमान -
मेष :
तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. कर्तृत्वाला संधी मिळेल.
वृषभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. हाती घेतली कामे मार्गी लागतील.
मिथुन : मुलामुलींच्या संदर्भात काही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
कर्क : जबाबदारी वाढेल. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता आहे.आरोग्य चांगले राहील. 
सिंह : दिवस प्रतिकूल आहे. खर्च वाढणार आहेत.मानसिक त्रासाची शक्यता आहे.
कन्या : अपेक्षित पत्र व्यवहार व गाठीभेटी होतील. व्यवसायाची उलाढाल वाढेल.
तूळ : व्यवसायाकडे तुम्ही अधिक लक्ष द्याल. आरोग्य चांगले राहील.
वृश्‍चिक : आत्मविश्‍वासाने कामे पार पाडाल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.
धनू : आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे.
मकर : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. मानसिक जबाबदारी वाढेल.
कुंभ : काहींना हितशत्रूंचा त्रास होईल. शासकीय कामे पुढे ढकलावीत.
मीन : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com