esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 4 जानेवारी २०२१
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
सोमवार : मार्गशीर्ष कृष्ण ५/६, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या, चंद्रोदय रात्री ११.२३, चंद्रास्त सकाळी ११.०९, क्षयदिन, भारतीय सौर पौष १४ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 4 जानेवारी २०२१

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
सोमवार : मार्गशीर्ष कृष्ण ५/६, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या, चंद्रोदय रात्री ११.२३, चंद्रास्त सकाळी ११.०९, क्षयदिन, भारतीय सौर पौष १४ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८०९ : अंधांसाठी उपयोगी ठरलेल्या ब्रेल लिपीचा जनक लुई ब्रेल यांचा पॅरिसमध्ये जन्म.
१८१३ : लघुलिपीचा संशोधक आयझॅक पिटमनचा इंग्लंडमध्ये जन्म.
१८८१ : ‘केसरी’ वृत्तपत्र पुणे येथे लोकमान्य टिळक यांनी सुरू केले.
१९०७ : युगप्रवर्तक गुजराती कादंबरीकार, कवी व विचारवंत गोवर्धनराव माधवराम त्रिपाठी यांचे मुंबईत निधन.
१९०९ : नामवंत मराठी लेखक, विचारवंत, पत्रकार प्रभाकर पाध्ये यांचा जन्म.
१९४८ :   ब्रह्मदेशामध्ये प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले.
१९६३ : सवाई गंधर्व पुण्यतिथी महोत्सवात झाकिर हुसेन या अकरा वर्षांच्या मुलाच्या तबलावादनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले.
१९९४ : गेली अनेक तपे आपल्या सुमधुर संगीताने रसिकांना मंत्रमुग्ध करणारे विख्यात संगीत दिग्दर्शक राहुलदेव (आर.डी.) बर्मन ऊर्फ ‘पंचमदा’ यांचे निधन. 
२००१ : सलग सतरा वर्षांच्या अथक संशोधनानंतर संपूर्ण भारतीय बनावटीच्या हलक्‍या लढाऊ विमानाची चाचणी यशस्वी.

दिनमान -
मेष : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.
वृषभ : शासकीय कामे पुढे ढकलावीत. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
मिथुन : प्रॉपर्टीच्या कामात यश लाभेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.
कर्क : तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.
सिंह : थोरामोठ्यांचे परिचय होतील. शासकीय कामात यश मिळेल.
कन्या : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.
तुळ : नवीन परिचय होतील. आर्थिक लाभ होतील. तुमचे निर्णय योग्य ठरतील.
वृश्‍चिक : व्यवसायात नवीन तंत्र अंमलात आणू शकाल. कामात यश लाभेल.
धनु : तुमचे निर्णय योग्य ठरतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
मकर : प्रवास शक्‍यतो टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कुंभ : अपेक्षित पत्र व्यवहार होतील. शासकीय कामात यश लाभेल.
मीन : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. व्यवसायात धाडस करावे.

Edited By - Prashant Patil