आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ४ मार्च २०२१

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 March 2021

पंचांग -
गुरुवार : माघ कृष्ण ६, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्चिक, चंद्रोदय रात्री ११.५०, चंद्रास्त सकाळी १०.३५, सूर्योदय ६.५२ सूर्यास्त ६.४०, भारतीय सौर फाल्गुन १३ शके १९४२.

पंचांग -
गुरुवार : माघ कृष्ण ६, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्चिक, चंद्रोदय रात्री ११.५०, चंद्रास्त सकाळी १०.३५, सूर्योदय ६.५२ सूर्यास्त ६.४०, भारतीय सौर फाल्गुन १३ शके १९४२. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९२५ : प्रसिद्ध बंगाली साहित्यिक, कवी व अभिनेते ज्योतींद्रनाथ टागोर यांचे निधन. कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांचे ते थोरले बंधू होत.
१९६१ : भारताच्या आरमारातील पहिले विमानवाहू जहाज ‘आय एन एस विक्रांत’ नौदलात दाखल. 
१९८५ : गुरुवर्य डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांचे निधन. पुण्यातील नू. म. वि. आणि स. प. महाविद्यालय या शिक्षण संस्थांत त्यांनी अध्यापन केले. ‘विज्ञानप्रणीत समाचरचना’, ‘भारतीय लोकसत्ता’, ‘लोकसत्तेला दंडसत्तेचे आव्हान’, ‘भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म’, ‘ साहित्यातील जीवन-भाष्य’ इ. त्यांचे ग्रंथ गंभीर प्रकृतीची आणि व्यासंगाची साक्ष देणारी आहेत. 
१९९२ : ‘सकाळ‘च्या प्रकाशिका आणि ‘सकाळ पेपर्स लि.‘च्या संचालिका मादाम शांताबाई परुळेकर यांचे निधन.
१९९६ : प्रसिद्ध नाटककार आणि पत्रकार आत्माराम सावंत यांचे निधन.
१९९६ : चित्रकार रवी परांजपे यांना ‘कॅगहॉल ऑफ फेम’ ‘क्रिएटिव्ह कम्युनिकेशन’ कलाक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार जाहीर.
२००१ : पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत गुरदासपूर येथील रणजितसागर धरण देशाला अर्पण.

दिनमान -
मेष :
आपली मते पटवून देण्यात यशस्वी व्हाल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
वृषभ : आपल्या वस्तू गहाळ होण्याची शक्यता. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
मिथुन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार होतील.
कर्क : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मानसिक प्रसन्नता लाभेल.
सिंह : जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
कन्या : भागीदारी व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. 
तुळ : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.
वृश्‍चिक : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. वाहने सावकाश चालवावीत.
धनु : आर्थिक सुयश लाभेल. व्यवसायामध्ये प्रगतीचे वातावरण राहील.
मकर : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
कुंभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
मीन : अचानक धनलाभाची शक्‍यता. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily Horoscope and Panchang of 4th March 2021