आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 5 मार्च २०२१

Bhavishya_73.jpg
Bhavishya_73.jpg

दिनविशेष- 5 मार्च
1512 - प्रसिद्ध भूगोलतज्ज्ञ, गणिती व नकाशाकार गेरहार्ट मर्केटर यांचा जन्म. चेंडूच्या आकारासारख्या त्रिमितीतील पृथ्वीचा कागदावर नकाशा तयार करण्याचे अतिशय अवघड काम त्यांनी केले.
1851 - जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना.
1908 - ब्रिटिश आणि अमेरिकन रंगभूमीवरील तसेच हॉलिवूडच्या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते रेक्‍स हॅरिसन यांचा जन्म. क्‍लिओपात्रा या चित्रपटांत त्यांनी ज्युलियस सीझरची भूमिका केली होती.
1913 - किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गंगूबाई हनगल यांचा जन्म. पद्मभूषण, तानसेन पुरस्कार, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार आदी सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
1966 - समाजवादी व साम्यवादी विचारांचे व्यासंगी नेते शंकरराव मोरे यांचे निधन. त्यांनी लिहिलेला "प्राथमिक शिक्षण' हा ग्रंथ त्या विषयावरील आजही अपूर्व ग्रंथ मानला जातो.
1989 - गदर पार्टीचे संस्थापक, क्रांतिकारी स्वातंत्र्यसैनिक बाबा पृथ्वीसिंह आझाद यांचे निधन.
1995 - प्रसिद्ध अभिनेते जलाल आगा यांचे निधन.
1997 - ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या सप्तशताब्दीच्या सांगतेनिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेले टपाल तिकिटाचे प्रकाशन झाले.
1998 - नेहमीच्या अस्त्रांबरोबरच कमी पल्ल्याची विमानभेदी क्षेपणास्त्रे सोडू शकणाऱ्या, रशियाकडून घेतलेल्या "सिंधुरक्षक' या पाणबुडीचे मुंबई येथे आगमन.
1999 - संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या "पिनाका' या प्रक्षेपक यंत्रणेची ओरिसा येथील बालासोर येथे यशस्वी चाचणी घेण्यात आली. "पिनाका'चा टप्पा 39 किलोमीटर असून, त्यामधून 44 सेकंदात 12 रॉकेट उडविता येतात.
1999 - इंडियन फिजिक्‍स असोसिएशनतर्फे देण्यात येणाऱ्या आर. डी. बिर्ला स्मृती पारितोषिकासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर व प्रा. अशोक सेन यांची निवड.
2000 - कर्नाटकातील "कैगा' अणुवीजप्रकल्प (युनिट-2) पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण.
2001 - भारत आणि कोलंबिया यांच्यात व्यापारवाढीचे व परस्परांना एक कोटी डॉलरपर्यंत कर्ज देण्याची तरतूद असणारे चार करार करण्यात आले.

दिनमान -


मेष : कोणाच्याही आश्‍वासनावर अवलंबून राहू नका. खर्चाचे प्रमाण वाढेल.


वृषभ : तुमच्यावर एखादी जबाबदारी येवून पडण्याची शक्‍यता आहे. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधा.


मिथुन : विरोधकांवर मात कराल. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.


कर्क : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. नवीन परिचय होतील.


सिंह : दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील.


कन्या : अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल. जिद्द व चिकाटी वाढेल.


तुळ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल.


वृश्‍चिक : आरोग्य उत्तम राहील. मानसिक अस्वस्थता कमी होईल.


धनु : शत्रुपिडा नाही. कामाचा ताण व दगदग जाणवेल.


मकर : नवीन परिचय होतील. संततीसौख्य लाभेल.


कुंभ : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल.


मीन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com