esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 5 सप्टेंबर 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 5 सप्टेंबर 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दिनविशेष

शिक्षक दिन

१८८८ : जागतिक कीर्तीचे तत्त्वज्ञ आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म. त्यांच्या गौरवार्थ त्यांचा जन्मदिन हा ‘शिक्षक दिन’ म्हणून ओळखला जातो. त्यांना १९५४ मध्ये ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

१९१८ : भारताच्या औद्योगिक प्रगतीसाठी कापड गिरण्या, जलविद्युत प्रकल्प उभारणारे उद्योगपती, सर रतनजी जमशेटजी टाटा यांचे निधन. त्यांच्या नावे उभारलेल्या सर रतन टाटा ट्रस्ट न्यासाला त्यांनी सर्व वैयक्तिक संपत्ती दिली.

१९२० : बालसाहित्यिका लीलावती भागवत यांचा जन्म. बालसाहित्याचे कथा, कादंबरी, चरित्र, नाटुकली इत्यादी वाङ्‌मयप्रकार त्यांनी समृद्ध केले.

१९७८ : मराठी साहित्यिक, ज्येष्ठ पत्रकार रघुनाथ रामचंद्र ऊर्फ रॉय किणीकर यांचे निधन. ते मुंबई आकाशवाणीवरील ‘वाऱ्यावरची वरात’ व ‘मेघदूत’ या ध्वनिक्षेपित झालेल्या श्राव्य नियतकालिकांचे निर्माते व लेखक होते.

दिनमान

मेष : मानसिक प्रसन्नता लाभेल. कर्तृत्वाला संधी लाभेल.

वृषभ : जिद्दीने कार्यरत राहाल. काहींना भाग्यकारक अनुभव येतील.

मिथुन : व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. आरोग्य उत्तम राहील.

कर्क : अनेकांशी सुसंवाद साधाल. निर्णय अचूक ठरतील.

सिंह : मनोबल कमी राहील. दैनंदिन कामात अडचणी जाणवण्याची शक्यता.

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल.

तूळ : मनोबल उत्तम राहील. व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.

वृश्‍चिक : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

धनू : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

मकर : उत्साह, उमेद वाढेल. तुमचे अंदाज अचूक ठरतील.

कुंभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना विरोधकांचा त्रास संभवतो.

मीन : महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

loading image
go to top