
शनिवार : पौष कृष्ण ९/१०, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्चिक, चंद्रोदय रात्री २.५८, चंद्रास्त दुपारी १.२६, सूर्यास्त -७.०७, सूर्यादय - ६.२९, भारतीय सौर माघ १६ शके १९४२.
शनिवार : पौष कृष्ण ९/१०, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्चिक, चंद्रोदय रात्री २.५८, चंद्रास्त दुपारी १.२६, सूर्यास्त -७.०७, सूर्यादय - ६.२९, भारतीय सौर माघ १६ शके १९४२.
दिनविशेष
१९३२ : ‘प्रभात’ कंपनीचा ‘अयोध्येचा राजा’ हा पहिला मराठी बोलपट प्रदर्शित झाला. गोविंदराव टेंबे आणि दुर्गा खोटे यांनी त्यात प्रमुख भूमिका केल्या होत्या.
१९३९ : बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचे निधन. अत्यंत पुरोगामी आणि सुधारणावादी राज्यकर्ते म्हणून ते ओळखले जात. द्विभार्या प्रतिबंधक कायदा, अस्पृश्यता निवारण, बालविवाहाला बंदी अशा सुधारणा करणारे कायदे सर्वप्रथम त्यांनी अमलात आणले.
२००१ : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास आणि तंबाखूपासून बनविण्यात आलेल्या सर्व उत्पादनांची जाहिरात करण्यावर बंदी घालणारे तंबाखू उत्पादने (जाहिरात आणि नियमन) विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.
२००१ : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांचे निधन.
२००१ : पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असलेल्या चर्चगेटच्या इमारतीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल डाक विभागातर्फे टपाल तिकीट प्रसिद्ध.
दिनमान
मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रवासात दक्षता घ्यावी.
वृषभ : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. सौख्य व समाधान लाभेल.
मिथुन : प्रियजनांसाठी खर्च होईल. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.
कर्क : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
सिंह : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
कन्या : तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. जिद्द व चिकाटी वाढेल.
तूळ : जुनी येणी वसूल होतील. भागीदारीत महत्त्वाची उलाढाल होईल.
वृश्चिक : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.
धनू : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवादात सहभागी होऊ नये.
मकर : आर्थिक लाभाच्या दृष्टीने आजचा दिवस समाधानकारक राहील.
कुंभ : व्यवसाय व नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील.
मीन : नातेवाइकांसाठी जादा खर्च करावा लागेल. काहींना महत्त्वाची वार्ता समजेल.
प्रा. रमणलाल शहा