
पंचांग -
रविवार : पौष कृष्ण ११, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्चिक/धनू, चंद्रोदय पहाटे ४, चंद्रास्त दुपारी २.१९, सूर्योदय ७.०७, सूर्यास्त ६.३०, षट्तिला (स्मार्त) एकादशी, भारतीय सौर माघ १७ शके १९४२.
पंचांग -
रविवार : पौष कृष्ण ११, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्चिक/धनू, चंद्रोदय पहाटे ४, चंद्रास्त दुपारी २.१९, सूर्योदय ७.०७, सूर्यास्त ६.३०, षट्तिला (स्मार्त) एकादशी, भारतीय सौर माघ १७ शके १९४२.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दिनविशेष -
१९१५ : पुण्यातील ‘आर्यन’ हे पहिले चित्रपटगृह गंगाधर नरहर ऊर्फ बापूसाहेब पाठक यांनी सुरू केले. प्रदर्शित झालेला पहिला मूकपट होता ‘हिऱ्याची अंगठी.’
१९७६ - चित्रपट निर्माते ऋत्विक घटक यांचे कलकत्ता येथे निधन.
१९९३ : संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘पृथ्वी’ या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची ओरिसा येथील चंडीपूर येथे यशस्वी चाचणी.
२००० : दिगंबर जैन पंथीयांचे आद्य श्रद्धास्थान, तीर्थरक्षा शिरोमणी, तृतीय पट्टाचार्य आचार्य मुनीश्री १०८ आर्यनंदीजी महाराज यांचे अतिशय क्षेत्र नवागढ येथे निधन.
२००३ : ‘श्रमिकांचे जिवाभावाचे पुढारी’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ कामगार नेते जीवनराव सावंत यांचे निधन.
२००३ : महाराष्ट्र शासनातर्फे क्रीडामहर्षींचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा ‘श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार’ सचिन तेंडुलकरचे मार्गदर्शक रमाकांत आचरेकर यांना जाहीर.
दिनमान -
मेष : महत्त्वाची कामे शक्यतो दुपारनंतर करावीत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.
वृषभ : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. एखादी चिंता लागून राहील.
मिथुन : महत्त्वाचे निर्णय शक्यतो दुपारनंतर घ्यावेत. खर्चाचे प्रमाण कमी होईल.
कर्क : दुपारनंतर काहींना प्रतिकूलता जाणवेल. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.
सिंह : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल.
कन्या : जिद्द व चिकाटीने कार्यरत रहाल. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील.
तुळ : आत्मविश्वास वाढेल. व्यवसायानिमित्त प्रवास होतील.
वृश्चिक : व्यवसायातील महत्त्वाचे आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत.
धनु : खर्चाचे प्रमाण दुपारनंतर कमी होईल. मनोबल वाढेल.
मकर : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. प्रवासात काळजी घ्यावी.
कुंभ : सामाजिक व राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. मन आनंदी राहील.
मीन : दिवस अनेक दृष्टीने चांगला जाईल. व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल.
Edited By - Prashant Patil